बारामती (वतन की लकीर ऑनलाईन प्रतिनिधी): एखाद्या वर्गात हुशार विद्यर्थी सोडुन कच्च्या विद्यार्थ्याला शाळेचे नावलौकीक वाढविण्यासाठी जिल्हास्तीय परिक्षेत बसविणे म्हणजे अग्नी परिक्षाच म्हणावी लागेल. अशी परिस्थिती बारामती लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवाराची झाल्याची दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नंबर एकचे नेते व राजकारणातील चाणक्य म्हणुन ज्यांना संबोधले जाते असे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील नाराजांची मनधरणी करावी लागत असेल तर या विद्यार्थ्यामुळे शाळेचे नाव वाढेल की कमी होईल याचा विचार न केला तर बरं होईल असे जनसामान्यात चर्चेला उधान आले आहे.
वर्गात एवढी हुशार विद्यार्थी असताना कच्च्या विद्यार्थ्यासाठी शिक्षकांचे महामेरुला, मनधरणी करावी लागत असेल तर या महामेरुला निकाल काय लागणार हे तत्पुर्वी सांगणे म्हणजे पेपर फुटला असे होईल त्यामुळे तेरी भी चुप मेरी भी चुप असे तर सुरु नाही ना? असेही बोलले जात आहे.
मध्यंतरी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत महायुतीतील सर्व घटकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना पाटील यांनी काढलेल्या उद्गारावरुन सुप्रिया सुळेंना निवडुन आणा असे सुतोवाच केल्याचे बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे तो महत्वाचे आहे. असे म्हटल्यामुळे मतदारांमध्ये पवार साहेबांबाबत सहानभुतीची लाट उसळल्याचे दिसत आहे.
हे झाले इतर तालुक्याचे मात्र बारामती शहर व तालुक्याचा फडणवीस साहेबांनी आढावा घेतल्यास अजित पवार गटात एवढे गट तटाचे राजकारण आहे की यातील एक गट जरी नाराज झाला तरी तो विरोधात प्रचार करेल. आज मितीस उमेदवार फिक्स नाही त्यामुळे प्रचार प्रमुख कोणाला करायचे हाच पडलेला ग्रहण प्रश्न आहे यावरुनच पाहता येईल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराजी दुर करणार तरी कोणाकोणाची पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे, इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासह शिरूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक उभे राहण्याची शक्यता असलेले मंगलदास बांदल हे झाले नेते मंडळी पण सर्वसामान्य कार्यकर्ते व मतदारांमध्ये असलेली प्रत्यक्षपणे नाराजी ही कोण दुर करणार हे ही बोलले जात आहे. जनता विकासाच्या पाठीमागे आहे असे म्हटले जाते मात्र बारामती शहराचाच विकास म्हणजे सर्व लोकसभेचा विकास नव्हे लोकसभा तर दुर बारामती तालुक्यातील कित्येक गावांना आजमितीस टँकरने पाणी द्यावे लागत आहे त्यामुळे हा विकास म्हणता येईल का?
हे झाले लोकसभेबाबत येणार्या विधानसभेला आमची उमेदवारी फिक्स करा, आम्हाला विरोध होणार नाही याची गॅरंटी कोण घेणार असेही पुरंदर, दौंड, इंदापूर इ. ठिकाणचे फिक्स निवडूनच येणारे आमदार म्हणत आहेत. अन्यथा लोकसभेला राब राब राबायचे आणि आमदारकीला भिका मागायची अशी अवस्था होऊ नये त्यामुळे तत्पुर्वीच कळालेले बरं असेही विधानसभा मतदार संघातून उमेदवार व त्यांचे कट्टर कार्यकर्ते बोलताना दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी कोणत्याही ऍक्शन मोडला दिसत नाही. आमच्याशी बोलताना भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांनी कमळ घेऊन निवडणूक लढविली तर आम्ही सक्रीय तन-मन व धनाने प्रचार करू अन्यथा आम्हाला जे काही करायचे ते करू अशा प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.
इंदापूर व पुरंदरच्या नेत्यांनी मध्यंतरी विरोधात काम करण्याची तयारी दाखविली. तशा पद्धतीने मिडीयामध्ये प्रसार व प्रचार सुद्धा झाला. या नेत्यांचा टीआरपी सुद्धा वाढला मात्र, काही दिवसातच मनोमिलन होत असेल तर अशा नेत्यांची पोथी जनता ओळखल्याशिवाय राहत नाही. म्हणतात ना राजकारण लोकांपेक्षा —- बरी असे सर्व काही वेगळेच सुरू आहे त्यामुळे राजकारणी लोकांवर विश्र्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या मनावर ठाम विश्र्वास ठेवा.