बारामती(ऑनलाईन): विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बीबीए(सीए) विभागाने स्प्रिंग आणि हायबरनेट एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे प्रमुख उद्देश विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय आणि रिजेक्स टेक्नोलॉजीज प्रा. लि. फलटण/बारामती यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत विविध उपक्रम घेण्याचा आहे. मा. इंद्रजीत धालपे आणि मा. रुपेश गंगतिरे, रिजेक्स टेक्नोलॉजीज यांनी सदर कार्यशाळेचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये जावा प्रोग्रामिंग भाषेतील स्प्रिंग आणि हायबरनेट या फ्रेमवर्कच्या इत्यंभूत माहिती देण्याचच प्रयत्न करण्यात आला.
कार्यशाळेत एकूण 69 विद्यार्थी उपस्थित झाले. यात स्प्रिंग आणि हायबरनेट विविध प्रकारांचे, त्यांच्या वैशिष्ट्ये, वापराचे विधान आणि प्रोग्रामिंग प्रकल्पांत कसे वापरता येतात ह्याबद्दल चर्चा केली गेली.कार्यशाळेची सुरुवात स्प्रिंग आणि हायबरनेट फ्रेमवर्कच्या परिचयाने झाली. नंतर त्यांच्या मुख्य वैशिष्ट्यांची विस्तृत स्पष्टीकरण केले गेले. विद्यार्थ्यांना कार्यशाळेत प्रात्यक्षिक स्वरूपात प्रोग्रामिंग करण्याची संधी मिळाली.
आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये स्प्रिंग आणि हायबरनेट याबद्दल तर मार्गदर्शन मिळालेच पण त्यासोबत आणखी खूप सार्या नवीन गोष्टी शिकायला मिळालं असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी अशा नवनवीन कौशल्य शिकून आपल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव अग्रही राहिले पाहिजे असे मत आपल्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे आणि उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, विभागप्रमुख महेश पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेचे समन्वयन सलमा शेख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गुंजवटे यांनी केले, तर आभार अनिल काळोखे व वैशाली पेंढारकर यांनी व्यक्त केले कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशाल शिंदे, अक्षय भोसले, कांचन खिरे आणि अक्षय शिंदे यांचे ही महत्वाचे सहकार्य मिळाले.
.बीबीए(सीए) विभाग भविष्यात प्रोग्रामिंगच्या विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्याच्या ध्येयाने आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभवाची सुधारणा करण्याच्या उद्देशाने अशाच उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रयत्नशील असेल.