बारामती: भविष्यात कधी पहावे लागणार नाही अशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदार संघात निर्माण झालेली आहे. कार्यकर्ते एकमेकांविरोधात बोलत आहेत तर काही अतिउत्साही कार्यकर्ते सोशल मिडीयावर चांगली टिकाटिपण्णी करीत आहेत. या वादाच्या भोवर्यात बारामती लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने धनगर समाजाचा उमेदवार दिला तर पक्ष गेम चेंजर ठरू शकेल अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे.
बारामती ज्याप्रमाणे काका-पुतण्याच्या राजकारणामुळे प्रसिद्ध होती मात्र दुफळी निर्माण झाल्याने व यातून होत असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना बारामतीत मात्र भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शांत दिसत आहेत. हा सुरू असलेल्या संघर्षाचे नेत्रसुख घेत असल्याचे दिसत आहे.
बारामती पवारांचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जातो. या बालेकिल्ल्यातच पवार गटात संघर्ष पहावयास मिळत आहे. ओबीसी व बहुजन समाजाचा मतदार बारामती लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आहे. धनगर समाजाचा उमेदवार दिल्यास येणार्या निवडणूकीत धनगर समाजाचे मतदान निर्णायक ठरू शकेल अशी आशाही व्यक्त केली जात आहे.
यापुर्वी धनगर समाजाचे महादेव जानकर यांच्या उमेदवारी प्रसंगी चार लाख 4.51 हजार मते मिळाली होती. बारामती लोकसभा मतदार संघात काहींनी लक्ष घातले आणि अचानकच गायब झाले. आता बहुजन समाज पार्टीचे मायावतीजींनी जातीने लक्ष घातलेले दिसत आहे. धनगर समाजाचा उमेदवार निश्र्चित केला असल्याचेही बोलले जात आहे.
जर बहुजन समाज पार्टीतर्फे धनगर समाजाचा उमेदवार दिल्यास धनगर, ओबीसीचा देखील खासदार होऊ शकतो हे येणार्या निवडणूकीत सर्वांसमोर येईल व बारामतीत धक्कादायक निकाल लागू शकतो अशी परिस्थिती सध्यातरी दिसत आहे.