बारामती(ऑनलाईन): बहुजन समाज पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतीजी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष परमेश्र्वर गोणारे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत बहुज समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळुराम चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान,यावेळी बोलताना चौधरी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपच्या प्रमुख बहन मायावती यांनी स्टार प्रचारकाच्या यादीत माझा समावेश करून माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल पक्षश्रेष्टींचे आभार मानतो. या विश्वासास मी पात्र ठरून दिवसरात्र मेहनत घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत बसपाचे जास्तीजास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.