बारामती: अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा ओळखीच्या व्यक्तीला मतदान केले तर मत वाया जाणार नाही असे वक्तव्य शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिलावहिनी पवार यांनी केले आहे.
उद्धट (ता.इंदापूर) येथील सभेत सौ.पवार बोलत होत्या. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ.पवार पुढे म्हणाल्या की, अल्पभूधारक शेतकर्याचे राहणीमान आपण कसे वाढवू शकतो हे उद्देश शरयु फौंडेशन ठेवत आलेली आहे. खा.सुप्रिया सुळेंना वडिलांची पुण्याई पाठीशी आहे. मात्र त्यांनी कधीही कामात पवार नावाचा उपयोग केला नाही. निवडून द्यायचे का नाही द्यायचे हे तुम्ही ठरवायचे आहे. सध्या आपण मुखात राम म्हणतो मात्र, घराघरात महाभारत सुरू आहे. अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा ओळखीच्या व्यक्तीला मतदान केले तर मत वाया जाणार नाही. तुतारी फुंकणारा माणुस हे चिन्ह आहे खा.सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा निवडून द्या अशीही विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
संसदेत जावून बोलावेच लागते, मुद्दे मांडावेच लागतात हे काम खा.सुप्रिया सुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने करीत आहेत. लोकसभा निवडणूकीत आजपर्यंत खा.शरदचंद्रजी पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे या कधीही निवडणूक हारलेल्या नाहीत मात्र, त्यांना हरविण्याचे पाप तुम्ही करणार का? साहेबांनी तुम्हाला कधी त्रास दिला आहे का? काकनभर जास्तच दिले आहे. आपण दुसरीकडे बटण दाबले तर आपण साहेबांना दगा दिल्यासारखे होईल असेही त्या म्हणाल्या.