बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते व भावी खासदार सुनेत्रा पवार यांचे उपस्थितीत तांदुळवाडी वेस याठिकाणी उभारलेल्या श्रीकांत कैलास जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे अखंडपणे सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून श्रीकांतची ओळख आहे. तांदुळवाडी वेस परिसरातील नागरीकांशी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता व सामाजिक कार्यातून एक वेगळी नाळ जोडली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असतात पक्षात काम करणार्या कार्यकर्त्यांच्या मी सतत पाठीशी उभा आहे. त्याचाच एक प्रत्यत म्हणून नियोजित वेळ दिलेली नसतांना नियोजित कार्यक्रमातून वेळ काढून दादांनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील, महिलाध्यक्षा अनिता गायकवाड, अविनाश बांदल, सचिन सातव, सुभाष सोमाणी, विशाल जाधव, प्रकाश पळसे, अविनाश भापकर, तुषार लोखंडे, प्रितम वंजारी, ओंकार पवार, ऋषिकेश नीलाखे, अमर धुमाळ, रेहाना शेख, शितल गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शुभम भंडारे, असद बागवान, रोहित चांदगुडे, मोहन पंजाबी, किरण कुंभार, चेतन जाधव, निलेश गायकवाड, सागर नवले, संजय गुळवे, शांताराम बागल, ऋषी ढवळे, उदय देसाई, कैलास सावंत, संजय आहुजा, प्रशांत हेंद्रे, अरविंद लोंढे, प्रमोद बुलबुले इ. मोलाचे सहकार्य केले.