पुणे(प्रतिनिधी-प्रज्ञा आबनावे): कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात शनिवारी मध्यरात्री अंदाजे 24 वर्षीय तरूणीने उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तलावात बुडलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सदर अग्निशमन दलाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. सदर घटनेबाबत माहिती भारती विद्यापीठ पोलीसांनी दिली.
पोलीसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. सदर तलावाच्या ठिकाणी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधार असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर रविवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. बोटीतून जवानांनी पाहणी केली. तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्या करणार्या तरुणीची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.