विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी.बी.ए (सी.ए.) विभागाच्या वतीने आय आय टी बॉम्बे संलग्न स्पोकन टीटोरिअल कार्यशाळा आयोजित केली होती. महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी. ए.), बायोटेक, बीसीए सायन्स, बी.ए.स्सी संगणक शास्त्र, वाणिज्य या विभागातील ३०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
या कार्यशाळे अंतर्गत सी, सीप्लस, प्लस, एच टी एम एल, सेल डिझायनर, बायो पायथॉन, जावा स्क्रिप्ट, पायथॉन आणि अकाउंटिंग कोर्सचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेतून विदयार्थी डेटाबेस मैनेजमेंट, डेटा संगठन, डेटा संग्रहीतीकरण, वेब साईट तयार करणे आणि डेटा प्रवाह याचे ज्ञान कसे करावे याची माहिती मिळाली. संगणकीय भाषेच्या दृष्टीकोनातून अद्यावत ज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध नवे दृष्टीकोन या कार्याशालेतून विदयार्थीना प्राप्त करण्यात यश मिळाले असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे, विभाग प्रमुख प्रा. महेश पवार आणि विभागातील प्राध्यापकांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, विभागप्रमुख महेश पवार, स्पोकन टीटोरिअल आय आय टी बॉम्बे महाराष्ट्राचे समन्वयक विद्या कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेसाठी अनिल काळोखे यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील विशाल शिंदे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, अक्षय शिंदे, कांचन खिरे , सलमा शेख, वैशाली पेंढारकर यांची विशेष परिश्रम घेतले.