इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): इंदापूर तालुक्याचा विकास कामातून कायापालट करण्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी रात्रीचा दिवस केला. तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी त्यांच्या कृतीतून व केलेल्या विकास कामांतून दाखवून दिले आहे. मिळालेली संधी लोककल्याणासाठी हे त्यांचे ब्रीद वाक्यच होऊन बसले आहे. त्यामुळे आज इंदापूर तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर नेवून ठेवला आहे. सर्व समाजाचा उद्धार केला यामध्ये अल्पसंख्यांक समाजाला अल्पसंख्यांक विभागांतर्गत 3 कोटीचा निधी मंजूर करून अल्पसंख्यांक समाजाच्या गळ्यातील ताईत आमदार भरणे होऊन बसले आहे.
दिलेला शब्द खरा ठरविणारे आमदार भरणे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अल्पसंख्याक समाजासाठी निधी मंजूर करण्याचे सुतोवाच केले होते. इंदापूर शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांना भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
याविषया संदर्भात बोलताना आमदार भरणे म्हणाले की, आमदार म्हणून काम करताना सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाला उचित न्याय देण्यासाठी मी इमाने-इतबारे मेहनत घेतली असुन तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत विकासगंगा पोहचवली आहेच. परंतु या सोबतच खास करून दलित तसेच मुस्लिम वस्त्यांना सुध्दा भरभरून निधी देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे केला आहे. मात्र आपण एवढ्यावर समाधानी नसुन येणार्या काळात अजून यापेक्षा जास्त निधी मंजूर करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तालुक्यात प्रत्येक गावात 10 लक्षाची मंजूर झालेली विकासकामे करावयाची ती पुढीलप्रमाणे :-
न्हावी:-कब्रस्तान कम्पाऊंड व पेव्हर ब्लॉक, बिजवडी:- पठाण मज्जिद, पठाण वस्ती येथे सभामंडप, कालठण:- कब्रस्तान अंतर्गत रस्ता व वॉलंपाऊंड, सणसर:- दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे, अंथुर्णे:- मशिदी समोर सभामंडप, बोरी:- दफनभूमी इदगाह मैदान करणे, जंक्शन:- इदगाह मैदान करणे, बोरी:- शादीखाना हॉल, लाकडी:- मशीद समोर सभामंडप, शेळगाव-शेख वस्ती:- मशिद समोर सभामंडप, निमगाव केतकी:- इदगाह मैदान करणे, भिगवण:- दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे, जाचकवस्ती-शेख वस्ती:- मशिदीसमोर सभामंडप बांधणे, भांडगाव:- दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे, निमसाखर-शेखवस्ती:- मज्जिद समोर सभामंडप, डाळज नं.2:- मज्जिद समोर सभामंडप, शिरसटवाडी-पठाणवस्ती:- मज्जिद समोर सभामंडप, सणसर:-इदगाह मैदान बांधणे, कळंब-पठाण वस्ती:- मज्जिद समोर सभामंडप बांधणे, पोंदकुलवाडी:- शादीखाना सुशोभीकरण, काटी:- शुशोभिकरण करणे, कळंब:- कब्रस्तानला संरक्षण भिंत, निंबोडी येथे शुशोभीकरण करणे.
इंदापूर शहरातील प्रत्येकी 10 लक्षाची मंजूर झालेली विकासकामे :-
मदिना मज्जिद:- पेव्हर ब्लॉक व कॉंक्रिटीकरण, शेख मोहल्ला मज्जिद :- सुशोभीकरण, श्रीराम कॉलनी जवळील दफनभूमीमध्ये ईदगाह मैदान तयार करणे, दर्गा मज्जिद समोर शुशोभिकरण, दर्गा मज्जिद शेजारी दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे, जामा मज्जिद येथे संरक्षण भिंत व शेड बांधणे, मदिना मज्जिद समोर सुशोभिकरण करणे