बारामती : येथील विद्या प्रतिष्ठानचे कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे बीबीए (सीए) या विभागामार्फत राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालय विद्याटेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे, नगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामधून विविध महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी. ए.), बी. सी. ए. (सायन्स ) आणि बी. एस. सी.(कॉम्पुटर सायन्स) विभागाचे ३४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोग्रामिंग वॉर, प्रोजेक्ट प्रेसेंटेशन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धां आयोजित केली होती.
या स्पर्धेचे परीक्षण अजय गाढवे, श्रीमंत निकम, शेखर मोरे, आशा माने, प्रियांका सूळ, सारिका गाडेकर यांनी केले.
स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे :-
१) पोस्टर प्रेझेंटेशन
नेहा शिंदे टी.वाय.बी. बी. ए. (सी. ए.) विद्या प्रतिष्ठान कॉलेज, शिंदे सोनिया वाघिरे महाविद्यालय सासवड, माने महेश आणि बागवान जुवेरिया टी वाय बी. सी. एस. विद्या प्रतिष्ठान कॉलेज यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
२) प्रोजेक्ट प्रेझेंटेशन
काळे रोहित जालिंदर, टी.वाय.बी. बी. ए. (सी. ए.), टि सी कॉलेज, रितेश रमेश धापटे एस.वाय.बी. बी. ए. (सी. ए.) विद्या प्रतिष्ठान कॉलेज, साबळे दिनेश विठ्ठल, टी.वाय.बी. बी. ए. (सी. ए.),मुधोजी कॉलेज फलटण यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
३) प्रोग्रामिंग वॉर चेडे शिवानी सुहास एफ.वाय.बी. बी. ए. (सी. ए.) विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती, थोरात प्रथमेश आर. टी.वाय.बी. बी. ए. (सी. ए.) पी. व्ही. पी. महाविद्यालय लोणी, महानवर मारुती बिरा टी.वाय.बी. बी. ए. (सी. ए.) वाघिरे महाविद्यालय सासवड यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
४) प्रश्नमंजुषा स्पर्धा
आशिष शामराव कापरे,टी.वाय.बी. बी. ए. (सी. ए.) वाघिरे महाविद्यालय सासवड विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे आदित्य गोपीनाथ इंगळे, एफ. वाय. बी.बी. ए. (सी. ए.) पायल शत्रुघ्न शितोळे,एफ. वाय. बी. सी. ए. (सायन्स ) यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
उद्गाटन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमास महाविद्याचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, उपप्राचार्य डॉ. घाडगे, प्रा. नीलिमा पेंढारकर, महेश पवार ,गजानन जोशी, किशोर ढाणे, गौतम कुदळे , जगदीश सांगवीकर, सर्व परीक्षक, प्राध्यापक आणि विध्यार्थी उपस्थित होते. यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. सिद्धेश टिळेकर, अँप्लिकेशन इंजिनिअर सिमू सॉफ्ट टेक्नॉलॉजी यांनी विद्यार्थ्यांनी अशा वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन जिंकलो/ हरलो यापेक्षा आपल्या मधील विविध कौशल्यांचाही विकास झाला पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील करिअर संधीबद्दल माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी स्पर्धेचे, स्पर्धकांचे आणि आयोजक बी.बी. ए.(सीए) विभागचे कौतुक केले. सर्व स्पर्धकांनी आपल्यामधील विविध कौशल्य अशा स्पर्धांमधून विकसित केली पाहिजेत आणि त्याचा आनंद आपल्या शैक्षणिक वाटचालीत कायम ठेवला पाहिजे अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. महेश पवार यांनीही त्यांच्या प्रास्ताविकात आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्दिष्टे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व भविष्यात नोकरी साठी किंवा व्यवसायात याचा नक्कीच त्यांना उपयोग होईल. बक्षीस वितरणास प्रमुख अतिथी प्रा. विशाल कोरे, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विद्या प्रतिष्ठान यांनी अशा स्पर्धांचा उपयोग विद्यार्थ्यांना प्लेसमेंट ड्राईव्ह उपयोगी ठरतो याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा अनुभव सांगत खूप काही शिकायला मिळाले, आत्मविश्वास वाढला अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेला विद्या प्रतिष्टान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अँड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव अँड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शाह,श्री. किरण गुजर, श्री मंदार सिकची,रजिस्ट्रार श्रीष कंबोज तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे व उपप्राचार्य डॉ.शामराव घाडगे यांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन सलमा शेख यांनी केले , अतिथींचे परिचय विशाल शिंदे यांनी तर परीक्षकांचा परिचय आणि आभार अनिल काळोखे व पूनम गुंजवटे यांनी करून दिले. स्पर्धेचे नियोजन करण्यात अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, कांचन खीरे, अक्षय शिंदे व सर्व संगणक शास्त्र आणि बी. सी. ए. (सायन्स ) विभागाचे सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले.