इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके) :- आपल्या अथक मेहनतीतून व कार्यकर्तृत्वाने शिवछत्रपती, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आदी थोर महापुरुषांनी इतिहास रचला. महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाच्या विचारांचा अभ्यास करत युवकांनी शिवचरित्राचे चिंतन केले पाहिजे. महाराजांनी केलेला आई- वडिलांचा आदर सन्मान युवकांनी शिकला पाहिजे असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी सर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते, माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांनी सन-2014-16 पासून सुरु केलेला शिवजयंती महोत्सव आजही शिवजयंतीचे आयोजक बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ड. राहुल मखरे व सहकार्यांनी दिमाखात सुरु ठेवला आहे.असे उद्गार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी काढले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह,महाराजांच्या मूर्तीस,तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या समाधीस्थळी पुष्प,पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
यावेळी जयंती कमिटीच्या व संस्थेच्या वतीने प्रा. यशवंत गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. ते भिमाई आश्रमशाळा येथे (दि.17) आयोजित प्रबोधनपर व्याख्यानावेळी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ड. समीर मखरे, गोरख तिकोटे, अस्मिता मखरे,माऊली नाचण,अमोल खराडे,युवराज बन, ड, सूरज मखरे, अक्षय मखरे, जावेद मुंडे, शितल पलंगे, सतिश आढाव तसेच मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले तर आभार साहेबराव पवार यांनी मानले.