बारामती(वार्ताहर): येथील समीर वर्ल्ड स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती सहा.मोटार वाहन निरीक्षक संजय पाटील, सौ.प्रज्ञा उमासे, देवराज बिल्डर्सचे विक्रांत तांबे, माजी नगरसेवक शामराव इंगळे, युनियन बँक ऑफ इंडिया बारामती शाखेचे मॅनेजर ललित गोरख, आय.डी.बी.आय बँक बारामतीच्या मॅनेजर सौ.माधवी कदम, सौ.चंद्रिका मॅडम, सौ.प्रज्ञा काटे, मनोज पवार, दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमोल यादव, बालरोगतज्ज्ञ डॉ.श्रीरामे, समीर वर्ल्ड स्कूलचे अध्यक्ष श्री.समीर सर व सौ.अंजूम मॅडम, समीर आय.टी.आय.चे प्राचार्य महेश कुर्हाडे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. आजच्या पिढीला भारतीय संस्कृती, निसर्ग संवर्धन याविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून पटवून दिले.
विविध गुणदर्शन कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश वंदनेने झाली. या कार्यक्रमाचा विषय भारतीय संस्कृती आणि प्रकृती होता. यामध्ये शिशुगटापासून ते नववी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय संस्कृतीचे दर्शन कार्यक्रमातून सादर करण्यात आले. निसर्गामध्ये होणार्या बदलांना कसे सामोरे गेले पाहिजे हा संदेश पथनाट्य व नृत्याद्वारा सादर केला गेला. शिवाजी महाराजांच्या काळातील लाठीकाठी, दांडपट्टा यासारख्या प्रात्यक्षिक करण्यात आले. नृत्यशिक्षक श्री.सचिन सर व शिशुगटाच्या मुख्य सौ.रसिका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम बसविण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी स्कूलचे अध्यक्ष, चेअरमन, प्राचार्या, तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सृष्टी शर्मा, कु.अक्षरा जाधव या विद्यार्थिनींनी केले व आभार प्रदर्शन सौ.प्रमोदिनी पवार यांनी मानले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्य व नृत्याला दाद देत कौतुक केले.