विद्या प्रतिष्ठान मध्ये ’सी’ प्रोग्रामिंग प्रकल्पावर स्पर्धा संपन्न
बारामती(वार्ताहर): अभ्यासा व्यतिरिक्त इतर कौशल्यांचाही विकास करण्यास विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सदैव तत्पर असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी केले.
बीबीए-सीए विभागा मार्फत डेनीस रिची, ’सी’ प्रोग्रामिंग लँग्वेजचे संस्थापक यांच्या पुण्यतिथी निमित्त पॉवर ऑफ सी नावाच्या ’सी’ प्रोग्रामिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.शिंदे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ज्यांनी कठोर परिश्रम घेतले ते विजेते ठरले. इतरांनी आपण कोठे कमी पडलो हे शोधले तर पुढील स्पर्धेत निश्चित विजयी होऊ असा विश्वास विद्यार्थ्यांना देऊन त्यांनी प्रेरित केले व सहभागी सर्व स्पर्धकांचे त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले.
परीक्षक ज्योती बर्गे आणि स्नेहल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि प्रकल्प निवडीचे भरभरून कौतुक केले. या स्पर्धेत बी.बी.ए. (सी.ए.), बी.सी.ए.(सायन्स) आणि बी.एस.सी.(कॉम्पुटर सायन्स) या विभागाच्या तिन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण 25 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत प्रोग्रॅम कोड आणि त्याबाबत असणारी अद्यावत माहिती देऊन उत्कृष्ट सादरीकरण केले. यामध्ये विविध गेम्स, एटीएम व्यवस्थापन प्रणाली, डिजिटल घड्याळ इ.सारख्या विविध प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
सदर स्पर्धेत बी.बी.ए. (सी.ए.) द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला ओंकार पवार याने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक सागर मेरावी (बी.बी.ए. (सी.ए.) प्रथम वर्ष) तृतीय क्रमांक महेश माने (बी.एस.सी. (कॉम्पुटर सायन्स) तृतीय वर्ष) यास मिळाले.
बक्षीस वितरण कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे व उपप्राचार्य डॉ.शामराव घाडगे, डॉ लालासाहेब काशीद, विभाग प्रमुख महेश पवार यांचे सहकार्य लाभले.
सदर स्पर्धेचे समन्वयक म्हणून सलमा शेख यांनी काम केले. सूत्रसंचालन पूनम गुंजवटे यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली पेंढारकर यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशाल शिंदे, अनिल काळोखे, अक्षय भोसले, कांचन खिरे, अक्षय शिंदे व सतीश चौधर यांनी परिश्रम घेतले.