बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस बारामती शहरचे अध्यक्ष अविनाश बांदल यांच्या अथक प्रयत्नातून बारामती शहरात 16 युवक शाखांचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जय पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आणखीन 25 शाखांचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असल्याचे श्री.बांदल यांनी सांगितले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करीत ढोल ताशाच्या गजरात बारामती शहरातील तांदूळवाडी, रुई,जळोची, खंडोबानगर, जगतापमळा, जामदार रोड, सिद्धेश्वर गल्ली, एकतानगर, वसंतनगर, पाटसरोड, अग्निशामक केंद्र, तीन हत्ती चौक, कॅनॉल रोड, प्रतिभानगर आमराई, हरिकृपानगर मार्केट यार्डसमोर, शेंडे मळा, बारामती हॉस्पिटल या शाखांचे उद्घाटन करून हॉटेल ग्लोबल खंडोबानगर याठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, महिला अध्यक्षा सौ.अनिता गायकवाड बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, नवनाथ बल्लाळ, बिरजु मांढरे, अभिजीत जाधव, नगरसेवक अमर धुमाळ, बबलु देशमुख, समीर चव्हाण, बाळासाहेब पाटील, अनिता जगताप, संजय संघवी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी अमोल कावळे, प्रताप पागळे, मंगेश ओमासे, अजिनाथ चौधर, पार्थ गालिंदे, विशाल जाधव, दिनेश जगताप, धीरज लालबीगे, अनिकेत पवार, साधु बल्लाळ, नितिन थोरात, तालुका युवक अध्यक्ष राहुल वाबळे, सोशल मिडिया अध्यक्ष तुषार लोखंडे इ. मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटन दरम्यान जय पवार यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पधादिकारी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. युवकांशी त्यांनी संवाद साधला. बांधकाम व्यवसायिक, उद्योजक यांच्या भेटी घेतल्या.