बारामती(वार्ताहर): येथील एस. आय. एज्यूकेशन ट्रस्ट संचालित, समीर आयटीआय (कटफळ) बारामती येथे 29 ते 31 जानेवारी 2024 रोजी तालुकास्तरीय हिवाळी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे भावे हायस्कुलचे मुख्याध्यापक उमेद सय्यद, पुणे जिल्हा केमिस्ट आणि ड्रगीस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष भारत मोकाशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.
या स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, खो-खो, लांबउडी, गोळा फेक इ.क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेसाठी तालुक्यातील माध्यमिक शाळा, ज्युनइर कॉलेज आणि आय टी आय अशा शाळांमधून 42 संघ व 492 खेळाडू उपस्थित होते.
पारितोषिक वितरण समारंभास जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यु.के.सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी सहा.सल्लागार अधिकारी डी.एन. गरदडे, संस्थेचे चेअरमन, आयटी आय चे प्राचार्य श्री.कुर्हाडे उपस्थित होते. या पाहुण्यांनी विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन पर मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रमोदिनी पवार आणि आभार प्रदर्शन सौ.मीना जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन, आय टी आय चे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.