काका, आम्ही ओला व सुका कचरा वेगळा करून रस्त्यावर कचरा करीत नाही असे शब्द उच्चारीत विद्यार्थ्यांनी केला स्वच्छता दूतांचा सत्कार!

बारामती(वार्ताहर): काका, आम्ही ओला व सुका कचरा वेगळा करून रस्त्यावर कचरा करीत नाही असे भावनिक शब्द उच्चारीत विद्यार्थ्यांनी बारामती नगरपरिषदेच्या स्वच्छता दूतांचा सत्कार केला.

12 फेब्रुवारी रोजी म.ए.सो.सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व कमाईतून मिळवलेल्या रकमेतून बारामती नगर परिषदेतील स्वच्छता कामगारांचा सत्कार केला. या उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यात श्रम प्रतिष्ठा निर्माण व्हावी हा होता.

सत्काराचे स्वरूप म्हणजे श्रीफळ, नॅपकिन व स्वतः बनवलेल्या कागदी फुलांचा पुष्पगुच्छ असे होते.

बारामती शहर व आसपासचा परिसर स्वच्छ करण्यासाठी बा.न.प.चे स्वच्छता दूत पहाटेपासुन शहर स्वच्छ करण्यामध्ये लागलेले असतात अशा स्वच्छता दूतांचा सत्कार करत असताना स्वच्छता कर्मचारी खूप भारावून गेले त्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.

या उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मोनिका खेडलेकर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक सर्वजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!