बारामती: खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्रशिक्षक मिननाथ भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला बारामती कराटे क्लबने काता व कुमिते प्रकारामध्ये 13 गोल्ड, 5 सिल्व्हर तर 1 ब्रांझ असे 16 पदके पटकावून क्लबचा सन्मान करण्यात आला.
11 फेब्रुवारी 2024 रोजी वडगाव शेरी, पुणे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविध जिल्हातील सुमारे 279 स्पर्धकांनी सहभागी घेतला. बारामती कराटे क्लबचे 8 खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत कु.सुहाना शेख ही सर्वात जास्त वैयक्तिक चषक मिळविणारी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विद्यार्थीनी ठरली. हिने 1 गोल्ड व 1 सिल्वर मेडलस चषक व रू.1100 चे रोख पारितोषिक प्राप्त करून बेस्ट प्लेयरचा बहुमान मिळविला.
या स्पर्धेत् यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व त्याचें पदके पुढील प्रमाणे :- 1) मनोज सुरवसे – 2 गोल्ड व चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चषक 2) मोहित बेलदार -2 गोल्ड व चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चषक 3) रेवा भारकड – 2 गोल्ड व चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चषक 4) चंदना करडी -2 गोल्ड, 1 सिल्वर व चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चषक 5) शिवम गिर्हे – 1 गोल्ड, 1 ब्रान्झ 6) शौर्य खंडागळे – 2 गोल्ड,1 सिल्वर 7) बिलाल मोहम्मद शेख – 1 गोल्ड, 1 सिल्वर 8) सुहाना शेख – 1 गोल्ड, 1 सिल्वर व चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चषक व 1100/- रोख रक्कम या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बारामती कराटे क्लबचे प्रशिक्षक मंथन मिननाथ भोकरे व सौ. शुभांगी मिननाथ भोकरे यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचे बारामती कराटे क्लबचें प्रमुख कराटे प्रशिक्षक व अध्यक्ष मास्टर मिननाथ रमेश भोकरे यांच्या वतीने अभिनंदन व पालकांचे आभार व्यक्त करण्यात आले.