आपल्या मुलाने इतर मुलांसारखे चांगले जीवन व्यतीत करावे, उच्चप्रतीचे कपडे वापरावेत, चांगले शूज वापरावेत, चांगली गाडी वापरावी, उच्च राहणीमानात जीवन व्यतीत करावे असे प्रत्येक आईला वाटते त्याप्रमाणे मलाही वाटले. परंतू राजवर्धनचे मन या दिमाखास रमले नाही, त्याने साधी राहणी उच्च विचार अंगिकारले. थोडयाच कालावधीत समाजकारण व राजकारणाचे धडे गिरवत समाजकारणाचे सामाजीक अधिष्ठान मिळवले व राजकारणात पाऊल ठेवले. आईचा आशीर्वाद हा मुलाला आजन्म पाठबळ देतो म्हणून माझ्या लाडक्या राजवर्धनला वाढदिवसाच्या मनापासून खुप खुप शुभेच्छा.
आज चि. राजवर्धन याचा वाढदिवस वाढदिवसा निमित्त काय व्यक्त व्हावं हेच सुचेना, लाडक्या मुलाचा वाढदिवस याचा आनंद आहेच परंतू तो त्याच्या क्षेत्रात यशस्वी होतोय याचा ही आनंद जास्त आहे. असा दुहेरी आनंद होत असताना व्यक्त होण्यासाठी शब्दच सुचत नाहीत. कन्या अंकिता आणि चि. राजवर्धन ही दोन अपत्य आम्हाला लाभली हे आमचे अहोभाग्यच आहे.
राजवर्धन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न व अडीआडचणी सोडवण्याचा प्रामाणीक प्रयत्न करत आहे. विवाह समारंभ, स्वागत समारंभ, व्यावसायीक उदघटने, वास्तुशांती , नामंकरण, थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, उत्सव, यात्रा, विविध धार्मीक, सांस्कृतीक व सामाजीक कार्यक्रम, वैद्यकीय भेट, सांतवन भेट आदितून तो कायम समाजीभिमुख राहत आहे. कोरोना काळात त्याचा रूग्णाप्रती दयाभाव आणि मदतीसाठीची धडपड मी पाहिली आहे. आजही शेतकर्यांच्या वीज प्रश्नाबाबत सतर्क राहुन कामे मार्गी लावत आहे. सर्व सामान्यांच्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडवत आहे.दुधदरवाड प्रश्न , शेतक-यांच्या मालाला हमी भाव याविषयी साहेबांबरोबर उपस्थित राहून संबधीत मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काडण्याचा प्रयत्न करत आहे . चालू स्थितीमध्ये त्याने जे क्षेत्र निवडले आहे त्यासाठी तो प्रामाणिकपडे कार्य करत आहे. पहाटे पासून ते रात्रीपर्यंत कार्याला वाहून घेत आहे, समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यात काही कायदेशीर अथवा इतर अडचणी असतील तर त्याची अस्वस्थता मी पाहत आहे. दौरे, भेटी, उदघाटणे, भूमिपूजन समाजातील नागरिकांचे अडीअडचणी यासाठी धावून जाणे यातून त्याला भोगावे लागणारे कष्ट आई म्हणून मला पहावत नाहीत. कारण अत्यंत लाडात वाढलेला माझा मुलगा त्याला इथल्या वातावरणाची इथल्या कशाचीच सवय नसताना पाटील कुटुंबाच्या परंपरेला साजेल असे कार्य करत आहे. समाजकारण आणि राजकारणाचे शिवधनुष्य पेलून राजवर्धन यशस्वी होताना दिसत आहे. समाजाने आणि पक्षानेही त्याची दखल घेत त्याच्यावर राजकीय जबाबदारीसोपवली आहे, ती जबाबदारी हि तो अत्यंत यशस्वीपणे तो पार पाडत आहे. हे सर्व पाहताना आई म्हणुन माझे मन भरून येत आहे तसेच अंतरीक समाधान ही होत आहे.
खरं तर आपल्या संपूर्ण पाटील कुटुंबाने गावांत, तालुक्यात व राज्यात सलोख्याचे समाजकारण आणि विकासात्मक राजकारण केले. मी पाहत आले आहे राजकारणात खुप सोशिक असावं लागतं, राजकारणात खुप टक्केटोणपे खावे लागतात. पूर्वी म्हणलं जायचं राजकारण म्हणजे सुळावरची पोळी आहे ते खरंच सत्य आहे. कारण राजकर्त्याला स्वतांच असं स्वतंत्र जीवण नसतं, स्वताच्या मनाप्रमाणे त्याला वागता येत नाही त्याला समाजमान्य जीवन जगावे लागते. समाजला रूचेल पचेल असेच जीवन अंगीकारावे लागते. सुखाची झोप राजकर्त्याच्या नशिबी नसते. सुखाचा संसार त्याच्या नशिबी नसतो, आयुष्यात सारखी धावपळ, कुटुंबाला वेळ न देता येणं, येणा-या कुठल्याही समस्येसाठी तत्पर असावं लागणं अश्यात कुठली समस्या दत्त म्हणुन उभी राहील हे सांगता येत नाही. राजकर्त्याच्या जीवनी सुख, शांती, आणि समाधान नसते त्यांना माहित असतं फक्त समाजासाठी झटणे. त्यांचं लक्ष असते समाज कसा उन्नत आणि प्रगत होईल त्यासाठी विकासात्मक धोरणे कशी आखता येतील यासाठी. आपल्या कुटुंबियांना त्यांना वेळ देता येत नाही उलट कुटुंबियांना हि त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करावे लागते आपुलकीने समाजात वावरावे लागते यात काहीही गैर नाही परंतू स्वतःसाठी तसेच स्वतःच्या शरीराची पुरेशी काळजी घेण्यासही त्यांना उसंत नसते. हे मी स्वतः खूप जवळून अनुभवले आहे.
साहेब व आमच्या वाटयाला जे कष्ट, यातनादायी क्षण आले ते माझ्या मुलांच्या वाटयाला येऊ नये म्हणुन मी सर्वोतोपरी प्रयत्न केले. सामाजिक आणि राजकीय व कौटुंबिक आघाडी सांभाळत मुलांचे पालन पोषणाबरोबरच उत्कृष्ट शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यासाठी दोन्ही मुलांचे शालेय शिक्षण पुणे येथे तर पदवीचे शिक्षण परदेशात होईल याची काळजी घेतली. कुटुंबासाठी व समाजासाठी वाहिनी म्हणून तर मुलांसाठी आई म्हणून मी कुठेच कमी पडले नाही. दोन्ही मुलांनी समाजकार्य व राजकारण न करता त्यांच्या इच्छेने वेगवेगळे कार्यक्षेत्र निवडावे अशी इच्छा मात्र कायम मणी होती. सर्वसामान्य आईसारखी, आई म्हणून अशी अशी इच्छा असणे यात काही गैर वाटले नाही, कारण मी हि एक आई आहे काळजीपोटी असे वाटणे सहाजिक होते.
राजवर्धनचे शालेय शिक्षण पुणे या ठिकाणी झाले परदेशात उच्च शिक्षण घेऊनही राजवर्धनची (दादा) नाळ कायम आपल्या मायभूमीशी जोडलेली राहिली. परदेशात तसेच शहरी झगमगाटात वाढलेला राजवर्धन उच्चशिक्षित असून त्यांचे मन झगमगाटात रमले नाही. त्याला कायम ओढ राहिली ती आपल्या मायभूमीची, जन्मभूमीची आणि त्याच ओढीने राजवर्धनने समाजकारणात उडी घेतली. शेवटी त्याच्या इच्छेने तो या क्षेत्रात आला परंतू या क्षेत्रातील ठोकताळे, या क्षेत्रातील चाकोरीबध्द जीवन, या क्षेत्रातील आचारसंहिता, या क्षेत्रातील समाजाच्या अपेक्षा त्या अपेक्षेस उतरणे, या क्षेत्रातील कायमची दगदग असे आयुष्य आयुष्यभर व्यतीत करणे जमेल की नाही याची धास्ती मनाला होती. कारण मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो लहानच असतो आईची माया हि शेवटपर्यंत श्वासापर्यंत मुलाच्या काळजीत कार्यरत राहते.
तु पणजोबा श्रध्देय बाजीराव पाटील (आबा) यांची निर्मळ समाजसेवा, श्रध्देय शंकरराव बाजीराव पाटील (मोठे भाऊ) यांचेकडुन चारित्र्यसंपन्न राजकारण, आजोबा श्रध्देय शहाजीराव बाजीराव पाटील (आबा) यांचेकडून लढाऊ बाणा, खंबीरपणा, आजी श्रध्देय रत्नप्रभा शहाजीराव पाटील यांचेकडून सर्वाप्रती दयाभावना, साहेबांकडून निपक्षपाती शिस्तबद्ध राजकारण, बहिण मा. सौ. अंकीता पाटील ठाकरे कडून सर्वांप्रती राजकीय बंधूप्रेमाची कार्यप्रणाली. कुटुंबातील व समाजातील अणेक गुणवंताकडून चांगले वाटीतील ते ते गुण तू स्वतामध्ये अंगीकारले याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्याकडे पाहुन तु काय शिकला, माझ्याकडून कोणते गुण घेतले हे सांगण्यापेक्षा, मला माझ्या मुलात माझ्यापेक्षा जास्त गुण आहेत हे सांगायला जास्त आनंद वाटेल. माझा मुलगा या क्षेत्रात यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे यापेक्षा वेगळे भाग्य ते काय?
तु स्पष्टोक्ती आहेस तुला खोटं आवडत नाही. तुझ्याकडे कोणी अडीअडचणी घेऊन आलं तरं पुढचा मागचा विचार न करता गरजवंताला मदत करतोस. न्यायप्रिय, अन्यायाप्रती चीड एक घाव दोन तुकडे अशी तुझी काम करण्याची पद्धत. गरजवंताला मदत करताना परिनामाची तमा न बाळगणारा तू तुझी समाजाबद्दल समाजकार्याची निष्ठा आणि चिकाटी पाहुन मला तुझं खुप खुप कौतुक वाटते. तु नकीच अभूतपूर्व यशाला गवसणी घालशील यात शंका नाही. तुझे गौरवशाली कार्य पाहुन माझे मन अभिमानाने भरून येते यातच मी भाग्य समजते. माझ्या लाडक्या राजवर्धन च्या वाढदिवसनिमित्त, तू खूप खूप मोठा हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो अश्या शुभेच्छा आई म्हणुन व्यक्त करते.
- सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील