बारामती (प्रतिनिधी): राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या गटातील नागरिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षणास दि.31 जानेवारी 2024 रोजी पासून सुरूवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारी 2024 पर्यंत करावयाचे होते. तथापि काही ठिकाणी हे सर्वेक्षण 31 जानेवारी पर्यंत पूर्ण होऊ न शकल्यामुळे शासन निर्देशानुसार सर्वेक्षणाची मुदत 2 फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे.
सदर कामाकरिता बारामती नगरपरिषदेने 154 प्रगणक व 10 पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे. तरी बारामती शहरातील ज्या कुटुंबाचे सर्वेक्षण नजर चुकीने करायचे शिल्लक राहिले असेल त्यांनी पर्यवेक्षक श्री संजय चव्हाण, श्री महेश आगवणे, श्रीमती अश्विनी अडसूळ, श्रीमती योगिता दरेकर, श्रीमती सुप्रिया बोराटे, श्रीमती स्नेहल घाडगे श्री. रियाज काझी, श्री. संजय प्रभुणे, श्रीमती रंजना दुर्गाडे, श्रीमती रविना भोसले यांचेशी 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत नगरपरिषद फोन क्रमांक 02112-222307 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. महेश रोकडे यांनी केले आहे. तसेच नागरिकांनी सर्वेक्षण पूर्ण करणे कमी सहकार्य करण्यास आवाहन केले आहे.