इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): 19 फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने ज्या दिव्यांग बांधवांना हात नाही किंवा पाय नाहीत, अशा दिव्यांग बांधवांच्या जीवनात आधार देण्यासाठी मोफत कृत्रिम हात व पाय रोपण या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा ग्रामीण कक्षाच्या प्रमुख सीमा कल्याणकर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांसाठी हे शिबिर होणार आहे.
हात, पाय नसलेल्या लोकांना, कृत्रिम हात आणि पाय मिळून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार आहे. हात पाय नसणार्या जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सीमा कल्याणकर यांनी केले आहे.
यासाठी भूषण सुर्वे 8446660331, सीमा प्रशांत कल्याणकर 7796688214, सागर आवटे 9970848454, ऍड.आनंद केकान 9960250400, सोमनाथ लांडगे 9503521111, तसेच सुरेश मिसाळ (इंदापूर ) 9890812247 यांना संपर्क करून नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.