इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयमध्ये भारत देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट असे संचलन सादर केले. इंदापूर महाविद्यालयाचा विद्यार्थी रुद्रकुमार गवळी याची दिल्ली येथील आरडी परेड साठी निवड झाली आहे.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील यांनी यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय छात्रसेनेतील उत्कृष्ट कामगिरी केलेले विद्यार्थी चेतन भानवसे, मोनाली वाघमोडे, कोमल घयरे, अजिंक्य गोरे तसेच सीए परीक्षा पास झालेली महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आरती ओसवाल आणि इंदापूर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी जे सध्या लडाख येथे सैनिक म्हणून कार्यरत आहेत असे स्वानंद शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले भारताला सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना देणारे महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेच्या मसुदा समितीतील सर्व सदस्य यांना अभिवादन.माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादन करीत आहेत.
यावेळी संस्थेचे संचालक सुरेश मेहेर, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे, प्रा.कृष्णाजी ताटे ,विकास मोरे , दत्तू पांढरे, महादेव पांढरे ,मयूर शिंदे , डॉ.शिवाजी वीर ,डॉ. भिमाजी भोर, डॉ.सदाशिव उंबरदंड, प्रा. बापू घोगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा.दिनेश जगताप आणि राष्ट्रीय छात्र सेनेची विद्यार्थिनी अवंतिका मखरे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी आभार मानले.