इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आज संपली आणि अयोध्येमध्ये श्री राम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त इंदापूर शहरातील श्रीराम मंदिरामध्ये अनेक राम भक्त उपस्थित होते.

यावेळी या मंदिरामध्ये आयोद्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोठ्या स्किनद्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते. या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नागरिकांमध्ये बसून पाहिले तसेच यावेळी त्यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली .
यावेळी राम भक्तांनी जय जय श्रीरामाचा जयघोष करीत, आनंदी भक्तीमय वातावरणात या सुंदर क्षणाचा व प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा क्षण, प्रसंग आणि ते वैभव आपल्या डोळ्यामध्ये साठवून राम भक्तांनी श्री रामाचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सायंकाळी 4 वाजता प्रभू रामचंद्राच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव साजरा होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.