बारामती(प्रतिनिधी): भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. ला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा भव्य कार्यक्रम होणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12.30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभमुहूर्त असेल.

या धर्तीवर बारामतीत प्रत्येक गल्ली बोळात प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. श्रीरामनवमी उत्सव समितीतर्फे दुपारी 12 वा. भिगवण चौकात श्रीरामाची पूजा करून प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी फटाक्यांची अतिषबाजी पहावयास मिळणार आहे. श्रावणगल्ली मराठानगर याठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भगवे पताके, रिबन्स्ने सर्व मराठानगर भगवेमय झालेले आहे. यादिवशी 100 किलो लाडूचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. श्रीरामची मूर्ती असणारे आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधत आहे.

तांदुळवाडी वेस तरूण मंडळाच्या वतीने भव्य अशी रामाची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. बुरूडगल्ली, मारवाड पेठ, गांधी चौक, इंदापूर चौक, गुनवडी चौक इ. याठिकाणी आकाश कंदील, भगवे रिबन्स् लावण्यात आले आहे. सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

पश्र्चिम बंगालच्या मोहम्मद जलालुद्दीन आणि त्यांचा मुलगा बिट्टू या मुस्लिम कुटुंबाने या मुर्ती तयार केल्या आहेत. जलालुद्दीनचे कुटुंब पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील आहे. या कुटुंबाने देवी-देवतांच्या मूर्ती बनवण्यात नैपुण्य प्राप्त केले आहे.
‘RAM’JAN मे राम है! DI’WALI’ मे वली है तो किस बात का झगडा है! या प्रमाणे सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणेचा उत्सव जल्लोषात साजरा करावा अशी सर्वस्तरातून मागणी होत आहे.
22 जानेवारी रोजी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या राम मंदिरात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे. हा कार्यक्रम अविस्मरणीय आणि भव्य होण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.