बारामती दि. 22:– बारामती तालुक्यामध्ये कोविड-19 या विषाणूचा प्रार्दूभाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना संसर्ग झालेला रूग्णाकडून जादा बील आकारले बाबतच्या तक्रारी , औषधांचा भासत असलेला तुटवडा , औषध व इंजेक्शन वेळेत व माफक दरात रूग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी व त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी बारामती तालुका मध्यवर्ती सुविधा केंद्र , बारामती नगरपरिषद बारामती येथे सुरू करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रामध्ये बेड व्यवस्थापन कक्ष, अत्यावस्थ रूग्ण व्यवस्थापन कक्ष, रूग्णवाहिका व्यवस्थापन कक्ष, औषध व ऑक्सिजन व्यवस्थापन कक्ष, बील तपासणी कक्ष, इत्यादी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाचे प्रमुख पुढीलप्रमाणे
बेड व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश कराड (उपअधिक्षक, भूमीअभिलेख,), मो.नं – 9767422975, अत्यावस्थ रूग्ण व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख भानुदास साळवे , (सहाय्यक गट विकास अधिकरी, पंचायत समिती), मो.नं – 9850930692 या दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक – 7768808715 आहे.
रूग्णवाहिका व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख दत्तात्रय पडवळ , (तालुका कषि अधिकारी), मो.नं – 9767215274 , औषध व ऑक्सिजन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नांगरे (ड्रग इन्स्पेक्टर ), मो.नं – 7387561343 या दोन्ही कक्षांचा संपर्क क्रमांक – 7768808716 आहे.
बील तपासणी कक्षाचे प्रमुख धनंजय गाडे (लेखा परिक्षक वर्ग-2 सहकारी संस्था), मो.नं- 9175939664, कक्ष संपर्क क्रमांक – 7768808717 आहे.
ज्या कोरोना रूग्णास बेड , रूग्णवाहिका, औषध, ऑक्सिजन व जादा बील आकारले बाबतच्या तक्रारी असल्यास वरील कक्ष प्रमुखांशी संपर्क साधावा असे, आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.