शांत, संयमी समाज कार्याचे जे भाग्य घेऊन आलेला, एक उमदं नेतृत्व परवेज सय्यद!

शांत, संयमी समाज कार्याचे जे भाग्य घेऊन आले आणि त्यामध्ये सतत विजयी होत असलेले सहारा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवेजभाई सय्यद आहेत. सामाजिक कार्याची आवड, जिद्द, चिकाटी पाहता कोणतेही कार्य हाती घेतल्यास ते निष्ठेने पुर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही ही त्यांची ख्याती आहे. सकारात्मक विचार सरणी, कोणालाही वाईट न बोलता चांगले कृती करुन एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आज त्यांचा वाढदिवसानिमित्त थोडंशी माहिती….

परवेजने मॅकॅनिकल इंजिनइर ही पदवी घेतली. होतकरू कष्ट करण्याची तयारी यातून बारामती एम.आय.डी.सी.मध्ये युनिटी एंटरप्राईजेस या नावाने वर्कशॉप सुरू केले. कुटुंबात चुलते पैगंबरवासी जहिरुद्दीन सय्यद हे शारदा व्याख्यानमालेचे संस्थापक सदस्य होते. पवारसाहेब व अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी एक आगळी वेगळी ओळख होती. चुलते सामाजिक कामाचा वसा घेत नीरा डावा कालवा समितीवर देखील सदस्य म्हणून त्यांनी उत्तम अशी कामगिरी केली. कुटुंबातूनच सामाजिक कार्याचे धडे मिळाल्याने तो वारसा पुढे परवेजचे वडिल वडील हाजी कमरुद्दीन सय्यद यांनी अखंडपणे पुढे सुरू ठेवला.

हाजी कमरूद्दीन सय्यद हे मुस्लिम बँकेत सेवा करीत नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून दहा वर्ष काम केले. तर काही वर्ष शिक्षण मंडळाचे सभापतीपद सुद्धा भूषविले. चाकोरी बद्ध नोकरी करणारे कधीही सामाजिक कार्याकडे वळत नाही मात्र, हाजी कमरूद्दीन सय्यद यांनी दाखवून दिले. या कार्यातून त्यांची इच्छा होती स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती व्हावी. ही इच्छा पूर्ण होणार ऐनवेळी कै.नारायण सिकची यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सय्यद परिवार मुलत: कसब्यातील त्यामुळे सातव कुटुंबियांशी त्यांचे कारभारी अण्णा पासूनचे कौटुंबिक संबंध आहेत.

मोरगाव रोड, खंडोबानगर या भागातील सर्व कार्यकर्त्यांची नाळ जोडणारा त्यांच्या मनावर राज्य करणारा परवेज आहे. परवेजचा येथील प्रत्येक घरातील व्यक्तींबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाहिला मिळाले. माजी नगराध्यक्ष सदाशिव (बापू) सातव यांनी आपल्या चिरंजीव नितीन सातव यांच्या कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस या भागातील जवळपास शंभर मतदारांची सर्व जबाबदारी परवेज सय्यद याच्यावर दिली होती. त्याने ही जबाबदारी चोखपणे पार पाडली हे मी नव्हे तर प्रत्येक मतदार व उमेदवारांनी सुद्धा पाहिली. प्रत्येक घरातील व्यक्तींची नावे, कुटुंब प्रमुखाचे नाव त्यांचे मोबाईल नंबर त्यांच्यापर्यंत वेळोवेळी प्रचाराला जाणे. मतदानाच्या दिवशी एकूण एक मतदान या परवेज ने करून घेतले. शेवटी मतदान झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष सदाबापू सातव यांनी देखील कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर मारून त्याला त्याच्या कामाची पावती दिली.

असा सर्व समावेशक उमदा कार्यकर्ता परवेज आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील या भागातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा मदतीचा दिखावा न करता मोठ्या प्रमाणात मदत केली. येथील गेल्या अनेक वर्षापासून गणेश मंडळाची स्थापना तसेच मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे खंडोबानगर येथील खंडोबाचे मंदिरात झालेले चिखल हे पाहिल्यानंतर त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन या भागातील कार्यकर्त्यांच्या मदतीने संपूर्ण मंदिर स्वच्छ धुऊन घेतले. कोणताही भेदभाव मनी न बाळगता पाच वेळा एकनिष्ठेने नमाज पठण करून सर्वधर्मसमभाव पाळणारा सख्ख्या भावाचे प्रेम सुद्धा कमी पडेल एवढा माझा मामेभाऊ परवेज आहे. हजरजबाबी व्यक्तीमत्व परवेजच्या वाढदिवसानिमित्त त्यास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

अल्ताफ सय्यद
संचालक ,मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!