बारामती(वार्ताहर): कोरोना कसा होतो, त्यावर कसा उपचार घ्यावयाचा कोणती औषधे घ्यायची याची संपूर्ण माहिती स्वत: अवगत करून इतरांना देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे कोरोना योद्धे बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आहेत.
बारामतीत मध्यंतरी रेमडेसिव्हर इंजेक्शनची कमतरता भासली. त्यावर प्रशासनाने व स्थानिक पदाधिकार्यांनी पुढाकार घेऊन सदरचे इंजेक्शन 12 मेडिकलमध्ये उपलब्ध करून दिले यामुळे रूग्णांचा व रूग्णांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. पवार हॉस्पीटलमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले मुंडे कुटुंबिय उपचार घेत आहेत. या कुटुंबियांतील एका मुलाला अंतिम टप्प्यात असताना इंजेक्शनची गरज भासली त्या कुटुंबियांनी तातडीने किरण गुजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यास पाच मिनीटात आहे त्या जागी मोफत इंजेक्शन उपलब्ध करून दिले. यामधुन किरण गुजर यांची तत्परता दिसून येते. रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांच्या भावना त्यांनी जाणून ते सतत अशा परिस्थितीत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देत आहेत.