बारामती (वार्ताहर): दि. 21 सप्टेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 33 तर ग्रामीण भागातून 49 रुग्ण आणि दि.20 सप्टेंबर मधील प्रतिक्षेत असलेले 06 जणांचा अहवालापैकी एक ही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही, असे मिळून 82 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आली आहे.
काल 182 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 41 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. इतर तालुक्यातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आहे. 144 रुग्णांची अँटीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 41 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 82 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 2 हजार 717 रुग्ण असून, बरे झालेले 1 हजार 505 आहे तर मृत्यू झालेले अडुसष्ट आहेत.
कालच्या प्रतिक्षेत येणाऱ्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नसताना आज 56 रुग्ण बाधित झाले आहेत. जनता कर्फ्यू संपुन पहिल्याच दिवशी 56 रुग्णाची नोंद झाली आहे. अजुनही काही व्यक्ती स्वत:ची काळजी घेत नसल्याचे दिसत आहेत. नागरीकांनी सतत मास्क, सॅनिटाइजर व गर्दीत जाणे टाळले पाहिजे तरच आपण या विषाणू पासुन लढा देऊ शकतो.