राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पार्टीच्या जिल्हा प्रवक्तेपदी दादासाहेब थोरात

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): अजित पवार गटाने अचानक सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) च्या विविध स्तरावर निवडी सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा प्रवक्तेपदी पत्रकार दादासाहेब माणिकराव थोरात यांची निवड करण्यात आली असुन खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, इंदापुर तालुकाध्यक्ष ऍड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे सुपुत्र उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे विचार महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आरक्षणाचे धोरण, महिला धोरण आणि शेतीचे धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या बरोबरच संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शाखाली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि भाजपाची लबाडी जनतेत नेहण्याचे काम आ.रोहित पवार यांच्या सहकार्याने करणार असल्याचे यावेळी बोलताना नवनियुक्त श्री.थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!