इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायत पैकी पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा – हनुमंत कोकाटे

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुक्यात नुकत्याच ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या यामध्ये बावडा, वकील वस्ती, शेळगाव, काझड, शिंदेवाडी, लाकडी यांचा समावेश होता. या ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये सहा ग्रामपंचायत पैकी पाच ग्रामपंचायती वरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पाच ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे यांनी केला आहे यावेळी बोलताना त्यांनी आमच्या पक्षाकडे सहा पैकी पाच ग्रामपंचायती निवडून आलेले आहेत. बावडा ग्रामपंचायत वरती आमचा निसटता पराभव झाला आहे. कोणी आमच्या पाच ग्रामपंचायतीवर दावा करत असेल तर आम्ही मागेही एकदा ओळख परेड केली होती. आणि आजही आम्ही ओळख परेड करण्यास तयार आहेत. असे जाहिर केले. माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे मुंबईवरून इंदापूरला आल्यानंतर पाचही ग्रामपंचायतीच्या सदस्यांची ओळख परेड होणार असेही यावेळी हनुमंत आबा कोकाटे यांनी जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल पवार उपसरपंच सागर व्यवहारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!