उद्या निमगाव केतकीत महाराष्ट्र केसरी निवड चाचणी -तुषार (बाबा) जाधव

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): महाराष्ट्र केसरी निवड चाचणी 65 वे अधिवेशन तालीम संघ पुणे जिल्हा यांच्या मान्यतेने धाराशिव या ठिकाणी होणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इंदापूर तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा निमगाव केतकी येथील सावतामाळी मंदिर या ठिकाणी शुक्रवार (दि.13) ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा.आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुषार (बाबा) जाधव यांनी दिली.

या निवड चाचणीसाठी आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, काकासाहेब पवार, विजयकाका बराटे, अमोल बुचडे, अमोल बराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी कुमार गटातील निमंत्रित 41 ते 45किलो, 48 किलो खालील, 55 किलो खालील, 60किलो खालील, 65 किलो खालील, 71 किलो खालील, 80 किलो, 92 खालील, आणि 110 किलो खालील निमंत्रित निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ गट गादी व माती गट 57 किलो,61किलो, 65 किलो, 70 किलो, 74 किलो, 79 किलो, 86किलो, 92 किलो.97 किलो, 86 ते 125 किलो, महाराष्ट्र केसरी निवड होणार आहे पैलवानांनी आधार कार्ड सोबत आणण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.

यावेळी इंदापूर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अशोक चोरमले, उपाध्यक्ष सचिन बनकर, योगेश शिंदे, संतोष पिसाळ, अस्मम मुलाणी, हनुमंत रेडके, शशिकांत सोनार, कुंडलिक कचरे, युवराज नरुटे, पोपाट शिंदे, हनुमंत पवार, सुद्दामहुसेन जमादार, गोपाळ वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होणार असून या स्पर्धेचे आयोजन मार्केट कमिटीचे संचालक तुषार जाधव तुषार जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!