बारामती(वार्ताहर): आर्थिक परिस्थिती हालाखिची, उपचार कसा करावा या सर्व प्रश्र्नाच्या कचाट्यात सापडलेल्या श्रीमती जनाबाई तळेकर (वय-73, रा.जळोची) यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश गावडे यांच्या तत्परतेने आर्थोपेडीक तज्ञ डॉ. अमोल भंडारे यांच्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून खुब्याच्या बॉलची शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मथळ्याखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथर शिंदे, श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष खा.डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे एसडीओ मंगेश चिवटे व कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले.
जनाबाई तळेकर यांना खुब्याच्या बॉलची शस्त्रक्रीया करणेस सांगितले होते. आर्थिक परिस्थितीमुळे गेले कित्येक दिवस शस्त्रक्रिया लांबली. जळोची गावातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी सौ.निर्मला जगताप यांच्याशी रूग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला. सौ.जगताप यांनी सतिश गावडे यांना सविस्तर माहिती दिली. सतिश गावडे यांनी वेळ न घालवता डॉ.भंडारे यांच्या येथे शस्त्रक्रिया यशस्वी केली.
रूग्णाच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश गावडे, सौ.निर्मला जगताप, सौ. पुष्पांजली जडे, सौ.कल्पना जाधव, संगीता जायभये, राजेंद्र नागरगोजे, महेश केदार, संदीप पोमणे, संतोष नाळे, श्रेयश भोसले यांचे आभार व्यक्त करीत कौतुक केले.