इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): जलसंधारणाच्या कामात मोठे योगदान देणार्या, गोर-गरीबांच्या लाडक्या वहिनीसाहेब सौ.शर्मिलावहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी चला खेळ खेळुया पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चांडाळ चौकडीच्या करामतीमधील मुख्य कलाकार रामभाऊ हे आकर्षक ठरणार असल्याचे आयोजक इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे व सौ.सारिका भरणे या दांपत्यांच्या हस्ते होणार आहे. रविवार दि.8 ऑक्टोबर रोजी सायं.5 वा. महादेव मंदिर परिसर बेलवाडी (ता.इंदापूर) याठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे.
या खेळामध्ये लकी ड्रॉ विजेत्या 10 महिलांसाठी साड्या भेट म्हणून देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक फ्रिज, द्वितीय एलईडी टीव्ही, तृतीय मानाची पैठणी, चौथ्या क्रमांकास कुलर, पाचवा-सोन्याची नथ, सहावा-टेबल फॅन तर सातव्या क्रमांकास चांदीचे नाणे अशी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
या कार्यक्रमास चंदुकाका सराफ ऍण्ड सन्स, बारामती मोरेरो फुडस प्रा.लि.बारामती, अजित पाटील मित्र परिवार, ऍड.सचिन वाघ ऍण्ड असोसिएटस्, पंकज मुथा बारामती व अमर ग्रुप ऑफ इंडिस्ट्रीज यांचे मोलाचे सौजन्य लाभलेले आहे.
तरी जास्तीत जास्त महिलांनी या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कला गुणांचे प्रदर्शन करावे व बक्षिस पटकवावे.