बारामती(वार्ताहर): आधुनिक काळात गुरु आणि शिष्य यांच्या व्याख्या अतिशय बदलल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत, त्या जगभरात कायम लक्षात राहतील. असाच एक गुरू शिष्याच्या नात्याला डॉ.हनुमंत बबनराव थोरात यांनी गुरूची ग्रंथ तुला करीत उजाळा दिला.
ही घटना अमरावती नगरीतील तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथीक मेडिकल कॉलजचे मा.प्राचार्य डॉ.गोकुलदास शंकरलालजी सारडा हे गुरू व बारामती येथील डॉ.हनुमंत बबनराव थोरात या शिष्याची.
बारामती येथील एका साधारण कुटुंबातील विद्यार्थी गेल्या 33 वर्षापुर्वी अमरावती येथे तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथीक मेडिकल कॉलज येथे शिकायला आला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षण कसे होईल हा प्रश्र्न बेचैन करीत होता. डॉ.सारडा यांनी मदतीचा हात पुढे करीत हनुमंतचे शिक्षण पूर्ण केले. गुरूंच्या क्लिनिकमध्ये होमिओपॅथीचे सखोल ज्ञानही आत्मसात केले. हनुमंत यांनी निष्णात होमिओपॅथीक डॉक्टर झाल्यावर बारामतीला आले. अल्पावधीतच डॉ.हनुमंत यांनी नावलौकीक मिळविला. अशा परिस्थितीत डॉ.हनुमंत हे गुरूला विसरले नाही त्यांनी 33 वर्षानंतर गुरूच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमरावती येथे सहपरिवार जावून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाजवळील गोरक्षणमध्ये गुरूची ग्रंथतुला केली व गुरू शिष्याच्या नात्याला पुन्हा एकदा उजाळा दिला.
या आनंदमय प्रसंगा समयी डॉ.हनुमंत यांची पत्नी लक्ष्मी, मुलगा डॉ.चैतन्य यांच्यासह शहरातील नंदलाल सारडा, राजेंद्र मालानी, प्रकाश करवा, प्रदीप मुंदडा, मदनलाल भुतडा, विजय आडतीया, डॉ.ललित भट, डॉ.प्रेमकुमार तापडिया, माजी प्राचार्य डॉ.रामगोपाल तापडिया, डॉ.संजय राठी, डॉ.बाबुरावजी निंभोरकर, विजय कोठेकर, डॉ.नंदकिशोर कलंत्री, डॉ.धीरज चितलांगे, ओमप्रकाश जाजू, नीरज लोया, प्राचार्य विजयकुमार भांगडिया, कमल सोनी, गोपाल जाजू, लालचंद गुप्ता, गजानन कोठेकर, ओमप्रकाश चर्जन, रमेश लढ्ढा, अनिल पनपालिया, डॉ.अंकित सारडा, डॉ.प्रकाश अडतीया, जुगलकिशोर सारडा, निलेश साबू, पंकज गुप्ता, डॉ.विजय राठी, सुधीर जोशी, डॉ.नरेंद्र सराफ, नरेश अतकरे, डॉ.ब्रिजमोहन सारडा, नीता सारडा, अर्चना सारडा, नंदकिशोर राठी यांच्यासह इ. मान्यवर उपस्थित होते.