शारदानगर(वार्ताहर): शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात हँगिंग बास्केट मेकिंगचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त मा. सुनंदा पवार, प्राचार्य प्रो.डॉ. एस. व्ही. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागाने केले होते या कार्यशाळेत 27 विद्यार्थिनी व 09 शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रा रा. बा. देशमुख यांनी यामधे बास्केट चे प्रकार व निवड, माती व इतर घटक त्यांचे प्रमाण, तयार करण्याची पद्धत व निवड, आवश्यक त्या वनस्पती त्यांचे प्रकार व निवड, रोपण, प्रथम पाणी देणे पद्धत आणि निगा व काळजी यावर सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रत्याक्षिकांसह मार्गदर्शन मिळाल्यानंतर सहभागी विद्यार्थिनींनी स्वतः हँगिंग बास्केट तयार करून महाविद्यालयात ठेवल्या. या प्रशिक्षणात अविनाश डावखर, तेजस वाबळे, महेश बंडगर, सुहास गवारे यांनी मदत केली. प्रो.डॉ.सोनवणे, प्रा.भगत, प्रा.नीकुळे, प्रा. पवार, प्रा.कासार आदी उपस्थित होते.