इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): संत सेना महाराज यांच्या मंदिराच्या सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
11ऑक्टोबर रोजी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी आ.भरणे बोलत होते. संत सेना महाराज यांची आरती आ.भरणे यांच्या हस्ते संपन्न झाली. संत सेना महाराज मंदिराच्या सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपये मंजूर केल्याबद्दल निमगाव केतकेतील नाभिक समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. गणेश शेळके व वैभव जाधव यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचाही सन्मान मामांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी ह.भ.पा. निलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांचे कीर्तन संपन्न झाले. व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत (आबा) कोकाटे, सचिन सपकळ तसेच निमगाव केतकी गावातील ग्रामस्थ इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज (भाऊ) जाधव, सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन दशरथ (तात्या) डोंगरे, माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब भोंग, शिवसेनेचे बबन खराडे, सामाजिक कार्यकर्ते विनय हनुमंतराव जाधव, दत्तात्रय चांदणे, ऍड.सचिन राऊत, दादासाहेब शेंडे, सचिन चांदणे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सेना महाराज मंडळाचे कार्यकर्ते ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप, संतोष मधुकर जगताप, संतोष हनुमंत जगताप, आप्पासो जगताप, दादाराम जगताप, बजरंग जगताप, तात्यासाहेब जगताप यांच्या वतीने करण्यात आले होते.