बारामती दि. 21:- चारचाकी वाहनांसाठीची नवीन मालिका एम.एच. 42 बी . बी . ही दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी पासून सुरू करण्यात आली होती . परंतु बारामती शहर व ग्रामीण भागामध्ये कन्टेनमेंट झोन जाहिर केल्याने व जनता कर्फ्युमुळे या मालिकेचे कामकाज पूर्ण करता आले नाही.
ज्या वाहनधारकांनी एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज कार्यालयात जमा केलेले आहेत अशा वाहनधारकांनी लिलावाच्या प्रक्रीयेसाठी दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत लिलावासाठी आवश्यक वाढीव धनादेश जमा करून दुपारी 4.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांचे दालनामध्ये लिलाव प्रक्रीयेसाठी उपस्थित रहावे असे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी , बारामती यांनी कळविले आहे.