बारामती(प्रतिनिधी): बारामती हा पवारांचा विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. बारामतीचे आमदार अजित पवार यांनी पक्षाची विचारधारा बाजूला ठेवत शिवसेना व भाजपबरोबर गेले. पक्षात दुफळी निर्माण झाली.
या दुफळीनंतर प्रथमत:च बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामतीत आल्या होत्या. त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा शुकशूकाट होता. मोजके पदाधिकारी बरोबर होते. यावरून कोण कोणत्या गटाचे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ज्या पदाधिकार्यांनी दंड थोपटत आम्ही अजित पवारांचे कट्टर समर्थक आहोत असे म्हणाले होते तेच सुप्रिया सुळेंच्या मागे-पुढे होते.
सुप्रिया सुळेंचे स्वीय सहाय्य यांनी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांना रेल्वे स्टेशनचे इथे सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या कामावर येण्यास विनंती केली. मात्र,नगरपालिका बरखास्त होऊन दीड वर्ष झाले त्यामुळे तिथे येता येणार नाही मी नटराजला आहे असे सांगितले. तद्नंतर सुप्रिया सुळे थेट नटराजमध्ये येऊन संपूर्ण पाहणी केली. त्याठिकाणी पत्रकारांनी सुप्रिया सुळेंना नानाविध प्रश्र्नांचा भडीमार केला. मात्र पत्रकारांच्या हाती काहीच लागले नाही.
बारामतीत काही पदाधिकार्यांमुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संभ्रमात तर आहेतच मात्र पक्षापासून दूर गेलेले दिसत आहेत. ज्यावेळी आ.अजित पवार यांनी वेगळा विचार केला त्यावेळी आमचे दैवत म्हणून काही कार्यकर्ते, नगरसेवकांनी कट्टर पवार साहेब समर्थकांनी स्टेटस् ठेवला असता, त्या कार्यकर्त्यांना हस्ते परहस्ते खडे बोल सुनावल्याचे कळते.
त्या कार्यकर्ते व नगरसेवकांनी ठामपणे सांगितले आज जो दिवस आम्ही पाहतो आहे तो फक्त आणि फक्त पवार साहेबांमुळेच कोण कुठे जाईल-येईल याबाबत आम्हाला काही एक देणंघेणं नाही आम्ही पवार साहेबांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार साहेबांच्या राजकारणापासुन बारामतीतील काही कुटुंब आजपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तसेच काही व्यापारी, जुनी जानती मंडळी ज्यांना पाहताक्षणी गर्दी होते अशांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत पवार साहेब बारामतीत जाहीर सभा लावीत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणार नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सुरू असलेला लपंडावाचा खेळ कधी ना कधी संपेल असा विश्र्वास सुद्धा काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
जे पदाधिकारी पक्षाच्या नेत्याच्या नावावर मोठी झाली ते वेगळा विचार करू शकतात किंवा स्वत:चा व्यवसाय सांभाळण्या साठी मागे-पुढे करू शकतात मात्र, पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ता आजही ठामपणे एकाच जागी आहे. त्याच्या डोक्यात असणारा संभ्रम कधी दूर होणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
आ.अजित पवार यांच्या मते विचारधारेचा विचार न करता सत्ता ही लोकांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी राबवायची असते. विचारधारा वेगळी म्हणून अडीच वर्ष शिवसेनेबरोबर आघाडी केली. भाजप-शिवसेनेची 25 वर्ष युती होती मग, आता भाजपबरोबर गेल्याने काय फरक पडतोय.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आ.अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत. आ.अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली व एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून सहभागी झाले. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आ.अजित पवार प्रथमच शनिवार दि.26 ऑगस्ट रोजी बारामतीत येत आहेत.
बारामतीत सत्काराला उत्तर देताना आ.अजित पवार बारामतीकरांना विशेषत: मतदारांसमोर काय भूमिका मांडणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.