बारामती(वार्ताहर): संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा कादंबरी पोवाडे आदी साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित दलित महिला कामगार वर्गाच्या व्यथा जगाच्या वेशीवर टांगल्या, तत्कालीन समाजाला अण्णाभाऊंच्या लिखाणाने विचार करायला भाग पाडले त्यांचे विचार आज देश विदेशात पोहोचले आहेत म्हणूनच ते जागतिक कीर्तीचे एक महान व्यक्तिमत्व ठरतात असे विचार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अविनाश बांदल, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अनिता गायकवाड, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधू बल्लाळ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विशाल जाधव,पार्थ गालिंदे,आदित्य हिंगणे,रेश्मा ढोबळे, द्वारकाताई कारंडे, ज्येष्ठ नेते टी. व्ही. मोरे इ.कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.