बारामती(वार्ताहर): येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी विद्रोही साहित्यकार, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी काळुराम चौधरी यांनी समितीच्या वतीने मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी उपनगरध्यक्ष भारत अहिवळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगरसेवक किरण गुजर, सुरज सातव, राजेंद्र बनकर, अभिजित चव्हाण, अभिजित जाधव, ऍड.सुशिल अहिवळे, ऍड.विनोद जावळे, अविनाश बांदल, साधू बल्लाळ, सुनील शिंदे, दशरथ मांढरे, विशाल जाधव, शुभम ठोंबरे, किशोर मासाळ, धनंजय तेलंगे, निलेश जाधव, उमेश दुबे, गौरव अहिवळे, उत्तम धोत्रे, रोहित बनकर,संजय वाघमारे, ऍड.किशोर मोरे, सतीश खुडे, मन्सूर शेख, स्वप्नील कांबळे, शब्बीर शेख, मा.पा सवाणे, एस.पी. शिंदे, सुरज जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.
दरम्यान,या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सदस्य प्रा.रमेश मोरे, गणेश सोनवणे, बबलू जगताप, सोमनाथ रणदिवे, चंद्रकांत भोसले, कैलास शिंदे, राहुल कांबळे, चेतन साबळे, सुशिल भोसले, परीक्षित चव्हाण, नितीन गव्हाळे, आकाश मेमाणे, प्रियानंद काकडे, सचिन काकडे, गौतम शिंदे, शुभम अहिवळे यांनी केले होते.