इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा. नीतिमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असेच गेली 27 वर्षे गोतमेश्र्वर माध्यमिक विद्यालय गोतंडीत ज्ञानदान देणारे जयवंत गुलाबराव जाधव यांचा सेवापुवर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
गोतंडी दि.31 जुलै रोजी गोतमेश्वर मंगल कार्यालय 54 फाटा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली.

यावेळी कामधेनु परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण आजबे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकीचे प्राचार्य चव्हाण सर यांनी हिंदीतून जाधव सर यांना भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अमर बोराटे सर अंथुर्णे यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. गोतंडी गावचे पोलीस पाटील हरिभाऊ खाडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण संस्थेचे अध्यक्ष दिनकर (नाना) नलवडे यांनी केले. आज पासून विद्यालयामध्ये ओळख ज्ञानेश्वरीची एक परिवार हा उपक्रम सुरू करण्यात आला. कार्यक्रमाचे सांगता पसायदान व वंदे मातरम ने करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणून ह.भ.प.हनुमंत महाराज, महादेवरत्न पारखी, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.विनायक नलवडे, सचिव जयश्रीताई नलवडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर, गणेशजी घोरपडे, जगन्नाथ पाटील, ज्ञानदेव काळे, माजी विद्यार्थी डॉ.वासुदेव पिसे, सामाजिक कार्यकर्ते धर्मशेठ लोढा, धुराजी शिंदे, सुभाष गायकवाड, शिवदास जाधव व विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मोरे यांनी केले. सुत्रसंचालन श्री.चव्हाण यांनी केले.