उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास करण्यासाठी आ.दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून होणार विकास

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकासा बरोबर तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन करण्यासाठी आ.दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापूरातील विविध गावांचा विकास होणार आहे.

दि.22 जुलै रोजी इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा.दत्तामामा भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून गोतंडीत मृदा व जलसंधारण विभागामार्फत गोटेड साठवण बंधार्‍यासाठी 164.96 लाख रुपयांचे विकास निधीचे कामे मंजूर करण्यात आले आहे.

त्या कामांचे उद्घाटन इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत (आबा) कोकाटे व सरपंच मनीषा पोपट नलवडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

पाण्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतिजीवन, मानवी जीवन आणि आधुनिक संस्कृती यांत पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेने आ.भरणे यांनी आणलेल्या निधीतून ही कामे होणार आहे.

यामध्ये स्मशानभूमी 39.19 लाख जैनवाडी दशरथ अडसूळ 25.33 लाख भारत नलवडे शेती 23.85 लाख हनुमंत लोहकरे शेती 25.70 लाख अमोल जाधव शेती 32.19 लाख संतोष भोसले शेती 25.70 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित बाळासाहेब करगळ, सचिन देवकर, विठ्ठल महाडिक, संतोष पवार, सुरेश कोकाटे, संतोष बनकर, काशिनाथ शेटे, कुंडलिक नलवडे,अशोक घोडके, माजी सरपंच शोभना कांबळे, गुरुनाथ नलवडे, शंकर भोंग, आप्पा पाटील, छगन शेंडे, आबा मारकड, रवी कांबळे, अनिल खराडे, सुनील कांबळे, अरुण नलवडे, सुरेश कांबळे, अमोल कांबळे, शिवाजी पाटील, माऊली जगताप, कुमार शिंदे, बापू पिसे, पप्पू ईवरे, प्रकाश मोरे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!