लाभार्थ्यांना देवाचे देव महादेवाच्या रूपात भेटले, आ.अजित पवार व आलताफ सय्यद
बारामती(प्रतिनिधी): समाजाचं आपण देणं लागतो या उद्देशाने मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद हे मुस्लिम समाजासाठी सतत सामाजिक कार्यक्रम राबवून समाजाची उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत असतात.
आलताफ सय्यद यांच्या मते माझं कोणाकडे जरी लक्ष नसले तरी समाजाचे माझ्याकडे लक्ष असते. त्यामुळे जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतून ढुसण्या देत असते.

या सर्व बाबींचा विचार करीत आलताफ सय्यद यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 70 गरजु, होतकरूंना प्रत्येकी 3 लाख प्रमाणे 2 कोटी 10 लाख रूपयांचे उन्नती मुदत कर्ज मिळवून दिले. कोरोना नंतरची परिस्थिती पाहता हाताला काम नाही, कित्येक व्यवसाय ठप्प झाले. कर्जाचा डोंगर माथी थयाथया नाचत आहे अशा अवस्थेत उन्नती मुदत कर्ज मिळाल्याने या 70 लाभार्थ्यांना संजीवनी मिळाल्यासारखे झाले आहे. या लाभार्थ्यांच्या मते देवाचे देव महादेव आ.अजितदादा पवार व आलताफ सय्यद यांच्या रूपात मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
उन्नती मुदत कर्ज मंजूर होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते. महामंडळाच्या ऑफिसला तक्रारींचा भडीमार केला होता. लाभार्थ्यांना आ.अजित पवार व आलताफ सय्यद यांच्यावर गाढा विश्र्वास होता त्यांना माहिती होते की, कावळ्याच्या शापाने कुठे गुरे मरत असतात का? पण या डोमकावळ्यांना समाजाने चांगलेच हेरले आहे. यांची मानसिकता, कृतीवर संशय व्यक्त केला जात आहे. अप्पा मारी गप्पा याप्रमाणे हे डोमकावळे चकाट्या मारीत होते. उन पाण्याने घर जळत नसते हे विसरून बसले आहेत.
एखादा व्यक्ती यशाच्या शिखरावर जात असेल तर लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. मुस्लीम समाजाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तन करण्यासाठी आलताफ सय्यद यांनी कंबर कसली आहे. लोकं आंब्याच्या झाडालाच दगडं मारतात, बाभळीच्या झाडाला मारीत नाही. समाजात काम करताना आलताफ सय्यद यांना विरोध होतो. टिका टिपण्णी होत असते मात्र, आलताफ सय्यद याबाबत अशा गोष्टींना भीक न घालता ते आणखीन उच्च शिखर कसे गाठता येईल याकडे पाहत असतात.
विरोध करणार्यांकडून गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ याप्रमाणे कृत्य होत असते. टाकीचा घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे समाज विध्वंसक विसरलेले आहेत. या लोकांनी कधी समाजासाठी काही केले नाही मात्र, एवढे आव आणतात की समाज आमच्या पाठीशी आहे. काही मंडळी चाव्यावर चालणारे बाहुले झाले आहेत. त्यांनी स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. स्वत:मध्ये धाडस व मर्दपणा असते तर त्यांनी थेट आरोप करावे. पदरामागे लपून कोण वार करते हे समाजाला सांगण्याची गरज नाही.
विरोध करणार्यांच्या मते आलताफ सय्यद यांनी स्वत:च्या पै-पाहुण्यांची कर्ज प्रकरणे केली. देवाच्या नावाने देवाला नारळ, बोकाड कापल्यावर त्यातला एकतरी घास तोंडात टाकताच ना का देवाला फोडलं कापलं म्हणून सोडून देता हे विरोध करणारांनी लक्षात ठेवले पाहिजे.
एखाद्याला सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना कुटुंबातील व्यक्ती, पै-पाहुण्यांची साथ नसेल तर तो व्यक्ती कधीही समाजात यशस्वी होत नाही. विरोधकांना त्यांच्या जन्म देणारे आई वडिलच किंमत देत नसतील तर यांनी समाजाच्या व समाजाचा उद्धार, उन्नती करणार्यांना बोट दाखवू नये.