इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): दत्तात्रय भरणे राज्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने विकास कामांमध्ये कधीही भेदभाव न करता सरसकट निधी मंजूर करत होते परंतु शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे धोरण राबविल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली होती याचा फार मोठा फटका इंदापूर तालुक्याला बसला होता. आता मात्र, जलसंधारणाच्या कामांसाठी 50 कोटींचा निधी प्राप्त झाल्याने इंदापूरकरांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ.दत्तात्रय भरणे यांनी विकास कामांचा डोंगर व निधीचा महापुर आणला होता. विविध विभागाच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी आणून विकास कसा करावा हे इतर आमदारांसमोर आदर्श ठेवला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कोटीतून निधी येत होता परंतु, अचानक एकनाथ शिंदे यांनी आमदारांनासोबत भाजपशी घरोबा करत महायुतीचे सरकार स्थापन केले.
इंदापूर तालुक्यातील विकास कामांची स्थगिती उठविण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी नेत्यांच्या माध्यमातून पाठपुरावा चालू होता परंतु यश मिळत नव्हते.
जसा राजकीय भूकंप झाला आणि सर्व समिकरणे बदलली आ.अजित पवार हे सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. नुसते सहभागी झाले नसून तर आर्थिक तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आल्या आहेत. आ.भरणे कमालीचे गतिमान झाले असून जलसंधारण विभागाच्या जवळपास 50 कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यामध्ये यश मिळवले आहे.
तसेच येणार्या काळात ते उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांची घौडदौड पूर्वीसारखी चालू ठेवतील.
स्थगिती उठवलेल्या कामांची यादी
मदनवाडी म्हसोबा मंदिर बंधारा (३४ लाख १९ हजार ९२७ रुपये), पिंपळे बापू ठवरे बंधारा (६२ लाख १३ हजार ९२५ रुपये),कळस येथील गावडेवस्ती बंधारा (३१ लाख २४ हजार ६२७ रुपये),कळस येथील गजानन वायाळ बंधारा (३२ लाख १० हजार ६३८ रुपये),कळस येथील ओमासे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ७६ हजार ३१४ रुपये), कचरेवाडी येथील श्रीरंग शेंडगे बंधारा (३५ लाख ५७ हजार ७५ रुपये), गोखली पारेकर वस्ती बंधारा (२२ लाख ८२ हजार ४६९ रुपये), गोखळी येथील अण्णा तरंगे शेतातील बंधारा (२८ लाख १२ हजार ९९६ रुपये),गोखळी येथील तरंगेवस्ती बंधारा (२३ लाख ७८ हजार १६४ रुपये),गोखळी येथील अंकुश वाघमोडे शेतातील बंधारा (२४ लाख ७० हजार १५६ रुपये), गलांडवाडी येथील गोविंद बोराटे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ९ हजार ८१८ रुपये),गलांडवाडी येथील डाकेवस्ती बंधारा (३४ लाख १५ हजार ६९१ रुपये),गलांडवाडी येथील तुळशीराम बोराटे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ९ हजार ८१८ रुपये), गोतोंडी येथील स्मशानभूमी परिसरातील बंधारा (३२ लाख १९ हजार ९१० रुपये),गोतोंडी येथील दशरथ अडसूळ यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ३३ हजार ४८० रुपये),गोतोंडी येथील भरत नलवडे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ८५ हजार ५५६ रुपये),गोतोंडी येथील हनुमंत लोहकरे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ७० हजार १४९ रुपये),गोतोंडी येथील अमोल जाधव यांच्या शेतातील बंधारा (३२ लाख १९ हजार ९१० रुपये),गोतोंडी येथील संतोष भोसले यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ७०:हजार १४९ रुपये), तरंगवाडी येथील चितळकर यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ८३ हजार ८७४ रुपये),तरंगवाडी येथील तुकाराम करे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ७० हजार १५६ रुपये),निमगाव केतकी येथील अमोल हेगडे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ४७ हजार ७९७ रुपये),निमगाव केतकी येथील भोसलेवस्ती बंधारा (५१ लाख ५ हजार ३२८ रुपये),निमगाव केतकी येथील गुजर मळा बंधारा (३५ लाख १३ हजार ९१७ रुपये), कालठन नं १ येथील जगतापवस्ती बंधारा (४५ लाख ४४ हजार २८८ रुपये),रेडा येथील गट नं.२५४ मधील बंधारा (२९ लाख ६५ हजार ७९८ रुपये),रेडा येथील उत्तम देवकर वस्ती बंधारा (२९ लाख ६१ हजार १२५ रुपये), खोरोंची येथील अनिल नगरे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ४७ हजार ६३४ रुपये),रेडनी येथील हनुमंत कदम यांच्या शेतातील बंधारा (३२ लाख ११ हजार ९४२ रुपये),रेडनी येथील नारायण रुपणवर यांच्या शेतातील बंधारा (३२ लाख ३७ हजार ४८८ रुपये), निमसाखर येथील रणजित पवार बंगला बंधारा (३६ लाख ६० हजार ४०६ रुपये), रणगाव येथील हनुमंत रकटे यांच्या शेतातील बंधारा (३७ लाख १७ हजार ५८२ रुपये), निंबोडी येथील महादेव घोळवे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ८२ हजार ५८५ रुपये),निंबोडी येथील मारुती घोळवे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ८० हजार ५२८ रुपये),निंबोडी येथील गोपीचंद घोळवे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ७४ हजार ३५४ रुपये),बोरी येथील धनु शिंदे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख २८ हजार ८६७ रुपये),बोरी येथील चांगण गुरुजी यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ३० हजार ९२४ रुपये), काझड येथील म्हेत्रे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ९८ हजार ६०८ रुपये),काझड येथील म्हेत्रे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ९८ हजार ६०८ रुपये),काझड येथील म्हेत्रे यांच्या विहिरी जवळील बंधारा (३० लाख ८७ हजार ९२ रुपये),काझड येथील हनुमानवाडी येथील बंधारा (२५ लाख ९३ हजार ५७७ रुपये),काझड येथील नानासाहेब नरुटे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ९२ हजार ७०७ रुपये), चाकाटी येथील सुभाष तनपुरे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ९८ हजार ९८९ रुपये), बोराटवाडी येथील दादा साखरे यांच्या शेतातील बंधारा (३० लाख ५९ हजार ५७७ रुपये),बोराटवाडी येथील हेगडकर वस्ती बंधारा (३० लाख ६५ हजार २९ रुपये),बावडा येथील बागल शेतातील बंधारा (४४ लाख ६२ हजार ९३१ रुपये),कळंब येथील सुनील सोलंकर यांच्या शेतातील बंधारा (२१ लाख ८ हजार ५३७ रुपये),कळंब येथील अनिल सोलंकर यांच्या शेतातील बंधारा (२६ लाख ४ हजार ६७ रुपये),कळंब येथील विर वस्ती बंधारा (३४ लाख ७६ हजार ८७८ रुपये), भांडगाव येथील यमाई माता मंदिर बंधारा (४१ लाख ८४ हजार ५६२ रुपये),भांडगाव येथील बर्गे शेत बंधारा (२८ लाख ७३ हजार ९८५ रुपये),भांडगाव येथील गायकवाड शेतातील बंधारा (३५ लाख १० हजार ११९ रुपये), काटी येथील पडसाळकर मळा बंधारा (२४ लाख ९९ हजार ९८२ रुपये), कौठली येथील गावठाण बंधारा (४२ लाख १३ हजार ९२० रुपये), पीटकेश्र्वर येथील जाधववस्ती बंधारा (२५ लाख ५३ हजार ५७६ रुपये), शिरसटवाडी येथील राहुल जाधव यांच्या शेतातील बंधारा (४३ लाख ७७ हजार ८८३ रुपये),शिरसटवाडी येथील अप्पा माळी यांच्या वस्तीतील बंधारा (३६ लाख ९० हजार ७५३ रुपये),शिरसटवाडी येथील भानुदास नागाळे यांच्या वस्तीतील बंधारा (३६ लाख ४३ हजार २६ रुपये), शिरसटवाडी येथील शिवदास हगवणे यांच्या वस्तीतील बंधारा (३९ लाख ८५ हजार ५७४ रुपये),शिरसटवाडी येथील रंजना देवकर यांच्या वस्तीतील बंधारा (२६ लाख ९ हजार १८५ रुपये),शिरसटवाडी येथील हनुमंत कदम यांच्या शेतातील बंधारा (६१ लाख ७ हजार ६२७ रुपये), दगडवाडी येथील चव्हाण वस्तीतील बंधारा (५० लाख ८४ हजार ७८२ रुपये),सराफवाडी येथील मोहम्मद शेख वस्तीतील बंधारा (५६ लाख २ हजार ५३२ रुपये), कौथळी येथील रतीलाल काळेल वस्तीतील बंधारा (३२ लाख ६८ हजार ३६९ रुपये), पीटकेश्र्वर येथील सुजित भिसे शेतातील बंधारा (३० लाख ६५ हजार २८४ रुपये), कडबनवाडी येथील रोहिदास गावडे यांच्या शेतातील बंधारा (२६ लाख ५९ हजार ८६२ रुपये) होणार आहे.तर तालुक्यातील व्याहळी येथे रूपांतरित तलावासाठी (७ कोटी ५८ लाख २५ हजार १०७ रुपये), काळेवाडी येथे रूपांतरित तलावासाठी (७ कोटी ५२ लाख ५३ हजार ६०५ रुपये), भावडी येथे रूपांतरित तलावासाठी (५ कोटी ४८ लाख २९ हजार ४७५ रुपये), शेटफळ गढे येथे रूपांतरित तलावासाठी (५ कोटी २५ लाख ४६ हजार १९५ रुपये) व न्हावी येथील तलावासाठी १ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.