आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, सण उत्सव सुद्धा सांगतात हम एक है! तरी सुद्धा काही मंडळी स्वत:चा स्वार्थ व काही साध्य करण्यासाठी एकमेकांच्या धर्मा-धर्मामध्ये वाद लावून देतात. युवा पिढी या आव्हानाला बळी पडतात हे कितपत योग्य आहे याचा विचार तरूण पिढीने केला पाहिजे.
आज कित्येक मुस्लिमांनी स्वत:हून सांगितले की, आषाढी एकादशी आहे त्यामुळे आम्ही कुर्बानी दुसर्या दिवशी करणार यामधूनच एकमेकांच्या धर्माबाबतचा आदर व्यक्त होतो. प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांनी सुद्धा सांगितले आहे की, दुसर्या धर्माचा आदर करा. प्रत्येक धर्मात सुद्धा असेच सांगितलेले असताना कुठं नक्की पाणी मुरते याचा विचार करण्याची गरज आहे.
राजकीय लोकांनी गेलेल्या माणसांचा विचार न करता, सध्याच्या माणसांचा विचार करून त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक इ. सारख्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. ऐकमेकांची डोकी फोडून पंचवार्षिक सोयीची जाईल मात्र, येणारा काळ तुमच्यासाठी महाभयंकर ठरेल याचा विचार करण्याची गरज आहे. राजकारणात कधी छापा तरी काटा असे होत असते. कर्नाटकात काय झाले आता त्या सरकारने काय सुरू केले याबाबत राजकीय लोकांनी विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक धर्मात जातीय सलोखा राखण्याबाबत सांगितलेले आहे. एकमेकांच्या धर्माबाबत आदर करण्याचे शिकविले आहे. काही मंडळी एकमेकांच्या जातीय द्वेष निर्माण करणारे कोण? स्वत:ला धर्माचा ठेका घेतल्यासारखे वागतात आणि स्वत:चा स्वार्थ साधून घेतात. त्यामुळे नागरीकांनी विशेषत: युवकांनी सजग राहण्याची गरज आहे.