पणदरे: येथील गितानगर येथे अज्ञात व्यक्तीने पुर्ववैमनश्यातून घराच्या दारात लावलेल्या दोन मोटारसायकली रात्रीच्यावेळी पेटवून दिल्या. त्यामध्ये दोन मोटारसायकली जळून खाक झाल्याने अंदाजे किमत एक लाख रुपयांचे नुकसान झाले. वरील घटना मंगळवारी घडली. मात्र पणदरे ग्रामपंचायतीने लावलेले सीसीटीव्ही गेली 7 दिवसांपासून बंद असल्याचे कळते. त्या प्रकरणी वैभव रामचंद्र भोसले (वय 49, रा.गितानगर, पणदरे) यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. माझ्या कुटुंबाचे पुर्ववैमनश्यातून नुकसान करण्याच्या उद्देशाने कोणीतरी माझी व माझे जावई विनोद शिंदे यांची अशी दोन मोटारसायकली पेटवून दिल्या.