इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री संत शेख महंमद महाराजांचा प्रथमच पंढरपूर भेटीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्याचे इंदापूर मध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.
श्री संत शेख महंमद महाराजांचा पालखी सोहळा प्रथमच श्रीगोंदा येथून विठुरायाच्या भेटीसाठी निघाला आहे. या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सामील झाले आहेत. यामध्ये महिला वारकर्यांची संख्या लक्षणीय आहे. खांद्यावर भगव्या पताका, टाळ मृदंगाचा नाद, ज्ञानोबा तुकोबा सह संत शेख महंमद महाराजांचा जयघोष व विठू नामाच्या गजरात श्रीगोंद्यातून मोठ्या भक्तीमय वातावरणात संत शेख महंमद महाराजांच्या पालखीने पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे निघाला आहे.
या सोहळ्याचे रोजी इंदापूर येथे मुक्कामी आगमन झाले.यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.