बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषद अंतर्गत शहर पथविक्रेता समिती निवडणुकी करीता महिलांसाठी आरक्षित ठेवावयाच्या 3 जागांपैकी 2 जागा राखीव ठेवण्यासाठी आरक्षण निश्र्चित करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 2 जागांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्र्चित करण्यासाठी अनु.जाती महिला, अनु.जमाती महिला, इतर मागास वर्ग महिला, अल्पसंख्यांक महिला, विकलांग महिला याप्रमाणे 5 चिठ्ठ्या पारदर्शक बॉक्समध्ये तयार करून टाकण्यात आल्या.
बा.न.प.शाळेची विद्यार्थी दुर्वा पवार हीस यामधील एक चिठ्ठी उचलण्यास सांगून पहिली जागा अनु.जाती महिलासाठी राखीव झाली तर दुसरी चिठ्ठी अनुष्का धोत्रे हीन उचलली ती इतर मागासवर्ग महिलासाठी निघाली. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दोन जागा जाहीर केले.
त्यानुसार पथविक्रेता (उपवीविका) संरक्षण व पथविक्री विनियमन 2014 अंतर्गत नियम 11(2)(ख-एक) अन्वये पथविक्रेता निवडणूकीसाठी आरक्षण खालीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारण प्रवर्गाकरिता (महिला राखीव-1) 3 जागा तर अनु.जाती प्रवर्गाकरतिा (महिला राखीव), अनु.जमाती प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग (महिला राखीव), अल्पसंख्यांक प्रवर्ग, विकलांग/दिव्यांग प्रवर्गाकरीता प्रत्येकी 1 जागा असे एकुण 8 जागा असणार आहेत असे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सविता धोत्रे यांनी कळविले आहे.
या आरक्षण निश्र्चित करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी पुणेचे श्रीमती सविता धोत्रे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, कामगार आयुक्त पुणेचे दुकाने निरीक्षक प्रशांत वंजारी हे अधिकारी उपस्थित होते.