काल दिवसभरात 95 रुग्ण कोरोना बाधित

बारामती(वार्ताहर): दि. 18 सप्टेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 57 तर ग्रामीण भागातून 38 रुग्ण असे मिळून 95 कोरणा बाधित रुग्ण संख्या आढळून आली आहे.

काल 250 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 46 व्यक्ती पॉझिटिव्ह आले असून 3 व्यक्तींचे नमुने प्रतीक्षेत आहेत. इतर तालुक्यातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहे. 127 रुग्णांची अँटीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 35 पॉझिटिव्ह आले आहेत बारामती शहरातील ऍक्टिव्ह सर्व मध्ये एकूण 71 जणांचे नमुने तपासले असता 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत म्हणजे काल दिवसभरात बारामतीत एकूण 95 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे.

बारामतीत 2 हजार 587 रुग्ण असून, बरे झालेले 1 हजार 290 आहे तर मृत्यू झालेले साठ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!