बारामती(वार्ताहर): मनाच्या सर्व शक्तींचा विकास करण्यासाठी आणि मनाला वश करण्यासाठी अष्टांग योगासारखा दुसरा कोणताही समर्थ असा उपाय नाही. म्हणूनच जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात योग दिनाला खूप महत्त्व आहे.
बुधवार दि.21 जून 2023 रोजी योग दिवस म्हणून पूर्व प्राथमिक विभागात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या कार्यक्रमात योग सप्ताह साजरा करण्याचे ठरविले ज्यामध्ये मुलांना चेतना व्यायामाचे प्रकार, सूर्यनमस्कार, बुद्धीला चालना देणारे व्यायाम इत्यादी योगाचे छोटे छोटे प्रात्यक्षिक सर्व ताईंसह मुलांनी करून त्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर आपण स्वतः कशाप्रकारे निरोगी राहू शकतो याची माहिती दिली. मुलांबरोबर पालकांनाही त्याचे महत्त्व पटवून देऊन मुलांसमवेत सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन करण्यात आले पालकांनीही त्याला भरभरून प्रतिसादही नोंदविला व फोटोही पाठविले.
मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास शाळेच्या शाला समितीच्या सर्व पदाधिकार्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले व शुभेच्छा लाभल्या.