बारामती(वार्ताहर): येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इ.12 वी कला विभागाचा अर्शानअली सय्यद तर इ.11वी विज्ञान विभागाचा खानशेहराज पठाण यांची 19 वर्षाखाली मुलांच्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात निवड झाली.
29 व 30 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेमध्ये सय्यद व पठाण या दोघांनी नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुलांच्या व्हॉलीबाल संघात स्थान पटकावले.
10 ते 13 जून 2023 रोजी भोपाळ मध्यप्रदेश येथे होणार्या 66 व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात या दोघांची निवड झाली.
या खेळाडू विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रा.लक्ष्मण मेटकरी व प्रा.किरण पवार यांचे संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.अशोक प्रभुणे, विश्र्वस्त सौ.सुनेत्रा पवार, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ऍड.नीलिमा गुजर, डॉ.राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज तसेच प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उप-प्राचार्य अंकुश खोत व महाविद्यालयातील शिक्षकांनी हार्दिक अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.